शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
4
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
5
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
6
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
7
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
8
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
10
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
11
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
12
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
13
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
14
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
15
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
16
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
17
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
18
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
19
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
20
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड तालुक्यात प्रस्थापितांना हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 16:41 IST

मनूर बुद्रुक येथे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा धुव्वा, तर पुतण्याही पराभूत

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जनतेने घराणेशाहीला नाकारल्याचे दिसून आले. यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, तर खडसे समर्थकांनाही हादरे बसले आहेत. तालुक्यात सर्वांच्या नजरा लागून असलेली मनूर बु. येथील निवडणूक यंदा धक्कादायक निकाल देणारी ठरली. मनूरमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचे पॅनल होते, तर या पॅनलमध्ये त्याचा पुतण्या सम्राट पंजाबराव पाटील हाही उमेदवार होता, तर विरोधात त्यांच्याच भाऊबंदकीत असलेल्या सागर प्रभाकर पाटील यांनी पॅनल उभे केले होते. अटीतटीच्या लढतीत सागर पाटील यांनी पूर्ण फायदा उचलत जिल्हा अध्यक्ष तुम्ही, आमदारकीसाठी तुम्ही, खासदारकी तुम्ही, जिल्हा परिषद तुम्ही व आता ग्रामपंचायतही तुम्हीच, असा प्रचार करत या निवडणुकीत आपली प्रतिष्ठापणाला लावली व यश मिळविले. यात ॲड. रवींद्र पाटील यांच्या पॅनलला अकरा जागांपैकी फक्त एक जागा मिळाली तर प्रतिस्पर्धी सागर पाटील यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या व एक अपक्ष विजय झाला. तर माजी पंचायत समिती सभापती राहिलेल्या प्रमिला इश्वेर जंगले, माजी पंचायत समितीचे सभापती भरत पाटील यांच्या पत्नी शोभाबाई पाटील, तर विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी सभापती गणेश पाटील यांच्या आई विमलबाई सीताराम पाटील यांचाही पराभव झाला. नाडगाव येथे माजी सभापतींची पत्नी पराभूत नाडगाव येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाच सून व भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती वीरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रंजनकुंवर पाटील या ईश्वर चिठ्ठीमुळे पराभूत झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी योगिता श्रीकष्ण लसूणकर यांना ३०२ मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीने योगिता श्रीकृष्ण लसूणकर या विजयी झाल्या.