शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यात पाण्यासाठी सात योजनांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:24 IST

पर्जन्यछायेतील तालुका होणार हिरवागार, दुसºयाच्या वाटेला जातेयं पाणी

ठळक मुद्देयोजना पूर्ण झाल्यास तालुका हिरवागारसर्व नदी-नाले पावसाच्या पाण्याने रिचार्ज करावेत

चुडामण बोरसे / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २४ - अमळनेर तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तापी नदीचे वाहून जाणारे पावसाचे पाणी प्रत्येक नाल्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये उपसा सिंचनाद्वारे टाकून सर्व नदी-नाले पावसाच्या पाण्याने रिचार्ज करावेत, यासाठी वेगवेगळ्या सात योजनांचा पर्याय सादर करण्यात आला आहे.या योजना पूर्ण झाल्यास पर्जन्यछायेत असलेला हा तालुका नक्कीच हिरवागार होण्यास मदत होईल, असा दावा केला जात आहे. तापी नदीवरून नियोजित उपसा सिंचनाच्या योजना खालीलप्रमाणे आहेत. योजनेचे नाव आणि त्याचा लाभ मिळणाºया गावांची नावे अशी आहेत-कळणी नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- राजवड, लोणे, भोणे, शामखेडे, कंडारी खुर्द, कंडारी बु.।।, सोनखेडी, पातोंडा, खेडी खवशी, अमळगाव व परिसर). चिखली नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- खेडी, राजवड, सारबेटे खुर्द व सारबेटे बुद्रूक, चांदणी, कुºहे, नगाव, गडखांब, धुपे, गांधली, पिळोदे, माजडी, अमळगाव व परिसर). बोरी नदी नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- महाळपूर, बहादरपूर, भिलाली, अंबापिंप्री, कोळपिंप्री, फापोरे, कन्हेरे, बिलखेड, हिंगणे, बहादरवाडी, अमळनेर व परिसर). दुरन्या नाला उपसा सिंचन योजना (लाभ मिळणारी गावे- शिरुड, हिंगणे, फापोरे, लोंढवे, अमळनेर, धार, मारवड व परिसर). इंदापिंप्री व कावपिंप्री नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- इंदापिंप्री, कावपिंप्री, शिरुड, फापोरे व परिसर). मालण नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- जानवे, डांगर, रणाईचे, बोरखेडा, गोवर्धन, मारवड, धार, मालपूर व परिसर). लवकी नाला उपसा सिंचन योजना- (लाभ मिळणारी गावे- जवखेडे, एकलहरे, मुडी बु.।।, बावड व परिसर).या योजनांच्या तांत्रिक माहितीसाठी चर्चा करण्यासाठी अमळनेर तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून चांदणी-कुºहे (ता. अमळनेर) येथे रविवार, २५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक होत आहे.अमळनेर तालुक्यात एक वर्ष पाऊस, तर दुसºया वर्षी काहीच नाही अशी स्थिती असते. आमच्या वाट्याचे पाणी दुसरीकडे वापरले जात आहे.-सुनंदा दिनकर पाटील, रिचार्ज योजनेच्या प्रवर्तक, शिरुड, ता.अमळनेर

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी