जळगाव- घरानजीक असलेल्या बुथवर दूध घेण्यासाठी जात असताना वंदना बापू नेरकर (वय-३५, रा़ इंदू हाईटस्समोर, त्र्यंबकनगर) या महिलेच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी धूम स्टाईलने लंपास केली़ शनिवारी सकाळी ७़३० वाजेच्या सुमारास ही घटना त्र्यंबकनगरातील इंदू हाईट्स समोर घडली़मंगलपोत हिसकावून ढकलून देत ठोकली धूमशनिवारी वंदना या नेहमीप्रमाणे सकाळी साडेसात वाजता घराजवळ असलेल्या दुधाच्या बुथावर दूध घेण्यासाठी घरातून निघाल्या़ त्या इंदू हाईट्ससमोरून जात असताना त्यांच्या समोरून दुचाकीवरून दोन तरूण आले़ त्यापैकी मागे बसलेल्या पिवळा टिशर्ट घातलेल्या तरूणाने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत हिसकावून त्यांना ढकलून देत धूम ठोकली़
जळगावात महिलेची मंगलपोत लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:13 IST
घरानजीक असलेल्या बुथवर दूध घेण्यासाठी जात असताना वंदना बापू नेरकर (वय-३५, रा़ इंदू हाईटस्समोर, त्र्यंबकनगर) या महिलेच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतची ११ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत दुचाकीवरून आलेल्या तरूणांनी धूम स्टाईलने लंपास केली़
जळगावात महिलेची मंगलपोत लांबविली
ठळक मुद्देदुचाकीवरुन आले चोरटेत्र्यंबक नगरातील सकाळी ७.३० वाजेची घटनामहिलेला ढकलून देत ठोकली धूम