शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

ध्येय निश्चित करा, स्वत:मधील कौशल्य ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 13:32 IST

नशिराबाद : दहावी - बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात मान्यवरांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनशिराबाद : विद्यार्थ्यांनी मनाला जे आवडेल तेच करिअर निवडावे. दुसऱ्यांच्या सल्ल्याने करियर निवडून नका. शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढल्याने, आधी ध्येय निश्चित करावे आणि त्यात आपले स्व: कौशल्य ओळखावे. असे आवाहन नशिराबाद येथे झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात मान्यवरांनी केले.येथील प्रभूचरण व्यायाम शाळेतर्फे दहावी - बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी भुसावळचे उप विभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड उपस्थित होते. तर व्यासपीठावर उद्योजक प्रकाश चौबे, दीपस्तंभचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, सरपंच विकास पाटील, उपसरपंच कीर्तीकांत चौबे , ग्रामपंचायत सदस्या सरला महाजन, सपोनि आर. बी. रसेडे उपस्थित होते.यानंतर यजुर्वेंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शंन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी मनाला जे आवडेल, तेच करून योग्य करिअर निवडावे, दुसऱ्यांच्या सल्ला घेऊन स्वत:चं करिअर निवडू नका. तसेच गावात अभ्यासिका व ग्रंथालयासाठी मदत करणार असल्याचेही सांगितले. गजानन राठोड यांनी सांगितले की, करियर निवडताना गोंधळून जाऊ नका, मेहनत करा, जिद्द बाळगा, तरच यश मिळेल. प्रकाश चौबे यांनी, शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन,स्किल इंडियाच्या माध्यमातून स्वत:चा विकास करण्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी गावात राबवित असलेल्या उपक्रमाला मदत देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.माजी सरपंच पंकज महाजन, विनोद रंधे, सय्यद बरकतअली, सय्यद नजीरअली, जनार्दन माळी, पी. पी. राणे, सचिन महाजन ,अरुण भोई, विनायक धर्माधिकारी, मुकुंदा रोटे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व पालक वर्ग उपस्थित होते . सूत्रसंचालन बी. आर.खंडारे यांनी केले. तर एस. एस. कोळी यांनी आभार मानले. प्रभूचरण व्यायाम शाळेचे प्रमुख कीर्तीकांत चौबे, सुनील साळी, जयेश कुमट, दीपक जावळे, उमेश झटके ,संतोष कोळी, आदींनी परिश्रम घेतले.या विद्यार्थ्यांचा झाला सत्काररिया चौधरी, मेघा आगरकर, गायत्री पाचपांडे, अंजुम गुलाब तडवी, वैष्णवी रंधे ,लोकेश न्हावी, रिता सावळे, दिपाली इंगळे संगीता भराडी वैशाली भोई, सपना कुंभार, शेख अस्वाद खान, मुस्कानबी ,खान असैया सय्यद, सृष्टी दीक्षित, स्वरांगी श्रावगी, अंकित पाटील, निखील माळी, सिद्धी अली, मयूर गायकवाड या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव