नोकराने पळविली मालकाची मुलगी, पालकांसोबत जाण्यास मुलीचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 11:15 PM2018-03-29T23:15:54+5:302018-03-29T23:15:54+5:30

प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.

The servant ran away, the girl's refusal to go with the parents | नोकराने पळविली मालकाची मुलगी, पालकांसोबत जाण्यास मुलीचा नकार

नोकराने पळविली मालकाची मुलगी, पालकांसोबत जाण्यास मुलीचा नकार

Next

जळगाव : प्रेम हे आंधळ असतं याचा प्रत्यय जळगाव तालुक्यातील एका गावात आला. ज्या शेतमालकाकडे रोंजदारीने काम करायचा, त्याच मालकाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेत विवाह करुन हे प्रेमीयुगुल गुरुवारी थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. या प्रेम कहाणीतील प्रियकर हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावातील सधन शेतकºयाकडे त्या गावाच्या शेजारीच असलेल्या गावाचा २८ वर्षाचा तरुण कामाला होता. शेतात केळीचे घड व पाने कापण्याचे तो काम करीत होता. त्यामुळे मालकाच्या घरापर्यंत त्याचे येणे-जाणे होते. त्या ओळखीतून मालकाच्या २० वर्षीय मुलीशीच त्याचे प्रेमप्रकरण निर्माण झाले. या दोघांचे प्रेम इतके बहरले की, त्यांनी थेट पळून जाण्याचा निर्णय घेतला. ६ मार्च रोजी ते जळगाव बसस्थानकावरून थेट सुरत येथे पळून गेले. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर मुलीच्या पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दिली. 

मुलीच्या आईला मानसिक धक्का
दरम्यान, पळून गेलेले हे प्रेमीयुगुल लग्न करुन गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दाखल झाले. हरविल्याची नोंद असल्याने पोलिसांनी पालकाला बोलावून घेतले. इकडे मुलगी पळून गेल्यामुळे आईला मोठा धक्का बसला.तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वडील, भाऊ व अन्य नातेवाईक पोलीस स्टेशनला आले. तिची समजूत घातली, मात्र मुलीने पालकांसोबत येण्यास स्पष्ट शब्दात नकार देत पोलिसांनाही तसे लेखी लिहून दिले. याशिवाय पालकांपासून धोका असल्याचेही तिने लिहून दिले. त्यामुळे पालक अक्षरश: मुलीपुढे हातपाय जोडत होते, मात्र तरीही मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मनपरिवर्तनासाठी लहान भावाची तिची भेट घालून दिली.पण मुलगी आपल्या भूमिकेवर ठाम राहिली.

तरुणाचे दुसरे लग्न

ज्या मुलासोबत ही मुलगी पळून गेली, त्या मुलाचे हे दुसरे लग्न आहे. आधीच्या पत्नीने त्याच्यापासून घटस्फोट घेतला आहे. दरम्यान, पळून जाण्याच्या आधी या मुलीचे लग्न निश्चित झाले होते. साखरपुड्याचाही कार्यक्रम झालेला आहे. ११ मार्च रोजी लग्नाची तारीख होती. हा मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत ५५ हजार रुपये महिना पगारावर नोकरीला आहे. तरीही या मुलाला नाकारुन ही मुलगी शेतमजुरासोबत पळून गेली.

Web Title: The servant ran away, the girl's refusal to go with the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.