शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू कसा होतो, हे मोबाइलवर पाहिले अन् काही क्षणातच विद्यार्थ्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने चार महिन्यांपासून तो तुकारामवाडीतील मामा ...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने चार महिन्यांपासून तो तुकारामवाडीतील मामा दीपक भदाणे यांच्याकडे आलेला होता. त्यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी ते कामानिमित्ताने घराबाहेर होते तर हर्षल व त्याची आजी प्रमिलाबाई हे दोघेच घरी होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आजी कामानिमित्ताने दुकानवर गेली. तेथून परत आल्यावर बाथरूममध्ये हर्षल हा साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. नातेवाइकांनी तातडीने हर्षलला खासगी रुग्णालयात नेले, नंतर तेथून जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

‘डेथ इन क्लॉक’ ही वेबसाइट

हर्षल याच्याकडे मोबाइल होता. या मोबाइलमध्ये त्याने ‘द डेथ इन क्लॉक’ ही वेबसाइट बघितली, त्यात मृत्यू कधी होणार म्हणून स्वतःची जन्मतारीख टाकलेली दिसून आली. यानंतरही त्याने यू ट्यूबसह अनेक वेबसाइट ओपन केल्याचे दिसून आले. आजी काही वेळासाठी बाहेर जाताच हर्षलने मोबाइलमध्ये बघितल्याप्रमाणे बाथरूममध्ये जाऊन गळफास घेतला.

बालहट्टामुळे घेतलेला मोबाइलच ठरला घातक

मयत हर्षल याच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता व बहीण कोमल असा परिवार आहे. दीपकच्या वडिलांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने हर्षलची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाहास मदत करते. एकुलत्या एका हर्षलच्या हट्टापायी तिने त्याला पैसे नसल्याने हप्त्यांवर पैसे परतफेडीच्या हिशेबाने काही दिवसांपूर्वीच १५ हजार रुपयांचा नवीन मोबाइल खरेदी करून दिला होता. मोबाइलचा हट्टच आणि हा मोबाइलच मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. तिचा जिल्हा रुग्णालयातील मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत. चौकशीत त्यांनी मुलाकडील मोबाइल जप्त केला आहे.