माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून करणार कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 20:13 IST2020-12-17T20:13:46+5:302020-12-17T20:13:55+5:30

जळगाव : ठोक मासिक शिपाई भत्ता देण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्ह्यातील ६०० शाळांमधील माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून कामकाज आंदोलन करणार ...

Secondary teachers will work with black ribbons | माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून करणार कामकाज

माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून करणार कामकाज

जळगाव : ठोक मासिक शिपाई भत्ता देण्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्ह्यातील ६०० शाळांमधील माध्यमिक शिक्षक काळ्या फिती लावून कामकाज आंदोलन करणार आहे.

विद्यमान कार्यरत पदावरील शिपाई संवर्गातील शिक्षकेतर पदे व्यपगत करण्यात येणार असून, सध्याच्या रिक्त पदांसाठी नियमित वेतन व भत्ते न देता प्रत्येक पदासाठी दरमहा ठोक स्वरूपात मासिक शिपाई भत्ता संस्थेला वेतन अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा व १२ फेब्रुवारी व २०१५च्या आदेशाने शासन नियुक्त भापकर समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघातर्फे करण्यात आली आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार (दि.१८) रोजी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देतील. शुक्रवारी काळ्या फिती लावून कामकाज करावे, असे आवाहन एच. जी. इंगळे, आर. आर. पाटील, साधना लोखंडे, एस. डी. भिरुड, एस. एन. पाटील, सी. सी. वाणी, आर. एच. बाविस्कर आदींनी केले आहे.

Web Title: Secondary teachers will work with black ribbons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.