पहिली पत्नी हयात असताना गुपचूप केला दुसरा विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:24 IST2018-04-09T17:24:58+5:302018-04-09T17:24:58+5:30

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ : शहर पोलिसात गुन्हा

The second marriage secretly while the first wife is alive | पहिली पत्नी हयात असताना गुपचूप केला दुसरा विवाह

पहिली पत्नी हयात असताना गुपचूप केला दुसरा विवाह

ठळक मुद्देविवाहितेमागे पैशांसाठी सासरच्यांचा तगादाकिरकोळ कारणांवरून सुरु झाला कांचनचा छळछळ असह्य झाल्यानंतर पीडित विवाहितेने दिली शहर पोलिसात फिर्यादअनिता नामक महिलेने दुसरी पत्नी असल्याचा केला खुलासा

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.९ : गेंदालाल मिल परिसरातील प्रशांत बाबूलाल सोनवणे याने पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचबरोबर पत्नीचा पैशांसाठी शारिरीक मानसिक छळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कांचन (नाव बदलेले) हिेचेशी प्रशांत सोनवणे याचे २०१५ मध्ये लग्न झाले होते़ लग्नाअगोदर प्रशांत हा मध्य प्रदेशमधील इटारसी येथे रेल्वेत नोकरीस असल्याचे सांगण्यात आले होते मात्र, प्रशांत हा खाजगी फोटोग्राफीचा व्यवसाय करीत असल्याचे लग्नानंतर काही दिवसातच कांचन यांना समजले. दरम्यान लग्नानंतर काही वर्षात त्यांना मुलगी झाली. मात्र, त्यानंतर काही महिन्यानंतर पती प्रशांत, सासू उषा बाबूलाल सोनवणे, सासरे बाबुलाल सोनवणे हे लहानशा कारणावरुन देखील कांचन यांचा छळ करू लागले.
सासू-सासऱ्यांनी वेगळे राहण्यास सांगितल्यानंतर कांचन व तिचा पती प्रशांत हे भुरे मामलेदार प्लॉट परिसरात भाड्याने घर घेवून राहू लागले. एके दिवशी कांचन ही घरात असताना एक महिला आली व मी प्रशांतची पत्नी अनिता असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर १३ आॅगस्ट २०१७ ला कांचनचा भाऊ हा पती प्रशांत यास समजाविण्यासाठी दत्तात्रय नगर, कानळदा रोड येथील घरी गेला होता. त्यावेळी सासरच्या कुटूंबियांनी शिवीगाळ करीत मारहाण केली़ यानंतर नवीन घर घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेवून येण्यासाठी तगादा लावाला़ अखेर कांचनने सासरच्या मंडळींचा छळाला कंटाळून शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The second marriage secretly while the first wife is alive