शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

भुसावळात तीन दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 5:50 PM

वेळेचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकान दुकांनावर सील करण्याची संयुक्त कारवाई पालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली.

ठळक मुद्देवार व वेळेचे उल्लंघनपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

भुसावळ, जि.जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भुसावळकरांची दखल घेतली कडक प्रशासन लागू करण्याच्या सूचना केल्या. शहरात गर्दी कमी करण्यासाठी ठरावीक दिवशी व वेळी दुकाने उघडण्याच्या नियमावली तयार करण्यात आली आहे. वेळेचे उल्लंघन करणाऱ्या तीन दुकान दुकांनावर सील करण्याची संयुक्त कारवाई पालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली.बाजारात गर्दी होऊ नये एकाच वेळेस सर्व दुकाने न उघडता वार व वेळेच्या बंधनासह शहरवासीयांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. ५ जून रोजी शणिमंदिर वॉर्डातील जय सीयाराम कॉम्प्लेक्समधील जयराम बच्चाराम मनमानी यांचे जयवैष्णव माता प्रोव्हिजन हे दुकान वेळेचे नियमभंग केल्यामुळे ५ रोजी सील करण्यात आले. ६ रोजी बाजारातील जयहिंद बेकरी ही बेकरी उघडण्याचा दिवस नसतानाही चुकीच्या दिवशी सुरू करण्यात आले. यामुळे सील करण्यात आले. तसेच खडका रोड येथील शेख नईम शेख इब्राहिम यांची न्यू इंजिनियरिंग वर्क्स हे दुकानसुद्धा वारचे उल्लंघन केल्यामुळे सील करण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत हे दुकाने सील राहणार आहे.शहरात वार व वेळेचे उल्लंघन कारवाई करण्यासाठी पाच पथक पालिका प्रशासनातर्फे नेमण्यात आले आहेत. ही कारवाई प्रभारी मुख्याधिकारी किरण सावंत पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकारी तसेच पालिकेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून चेतन पाटील, रामदास मस्के यांच्यासह पथकामध्ये नगर अभियंता पंकज पन्हाळे, पाणीपुरवठा अभियंता राजीव वाघ, अनिल मंदवाडे, सूरज नारखेडे, संजय बानाईत, लक्ष्मीनारायण नाटकर, राजेश पाटील, संतोष पल्लीवाल, गोपाळ पाटील, अनिल पाटील यांचा समावेश आहे.याशिवाय शहरातील यावल रोड, तापी नगर, दगडी पुलाचा परिसर या ठिकाणी सर्व दुकानदारांना वैयक्तिक भेटी घेऊन सूचना वजा समज देण्यात आलेली आहे. दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्यास कारवाई सक्तीने करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई करण्याचे सत्र सुरू होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ