एरंडोल येथे मद्य विक्रीची १५ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 17:09 IST2020-04-05T16:54:22+5:302020-04-05T17:09:53+5:30

लॉकडाऊनच्या काळातही दुकाने उघडी ठेवल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ५ एप्रिल रोजी मद्य विक्रीच्या १५ दुकानांना सील करण्यात आले.

Seal for sale of alcohol at Erandol | एरंडोल येथे मद्य विक्रीची १५ दुकाने सील

एरंडोल येथे मद्य विक्रीची १५ दुकाने सील

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात दुकाने खुली ठेवल्याचा आरोपराज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई

एरंडोल, जि.जळगाव : लॉकडाऊनच्या काळातही दुकाने उघडी ठेवल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ५ एप्रिल रोजी मद्य विक्रीच्या १५ दुकानांना सील करण्यात आले. एरंडोल शहर व परिसरातील ही दुकाने आहेत. यात परमिट रूम १०, बिअर शॉपी दोन आणि देशी दारूची तीन दुकाने इत्यादींचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारची मद्य विक्री होऊ नये. संचारबंदी काळात दारूमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्पादन शुल्क यंत्रणेचे दुय्यम निरीक्षक व्ही. एम. माळी, प्रकाश तायडे, रवींद्र जंजाळे यांच्या पथकाने रविवारी सकाळी ११ ते१२ वाजेदरम्यान दारूची दुकाने सील केली. या कारवाईमुळे तूर्त १५ एप्रिलपर्यंत मद्य विक्रीची सदर दुकाने बंद राहतील
 

Web Title: Seal for sale of alcohol at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.