फेक कॉल सेंटर चालविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:15+5:302021-02-05T05:57:15+5:30

पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे मोबाइल, विक्रम यादव नावाने बनावट कागदपत्राद्वारे विविध बँकांमध्ये खाते उघडल्याचे पुरावे, एटीएम व आधारकार्ड मिळून ...

The scoundrel who runs the fake call center smiled | फेक कॉल सेंटर चालविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

फेक कॉल सेंटर चालविणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडे मोबाइल, विक्रम यादव नावाने बनावट कागदपत्राद्वारे विविध बँकांमध्ये खाते उघडल्याचे पुरावे, एटीएम व आधारकार्ड मिळून आले. म्हसावद येथील सचिन संजय मराठे या तरुणाला बँकेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्यासाठी लॅपटॉप, नोंदणी, ऑनलाइन मुलाखत व प्रोसेसिंग फी अशी इतर कारणे सांगून त्याच्याकडून वेळोवेळी ९३ हजार रुपये घेतले. हा प्रकार २२ ऑगस्ट २०१८ ते २२ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत घडला होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक अंगद नेमाणे, सहायक फौजदार बाळकृष्ण पाटील, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण, दीपक सोनवणे व गौरव पाटील यांनी तंत्रज्ञानाद्वारे संशयिताची कुंडली काढली व दिल्ली येथे जाऊन त्याला अटक केली.

Web Title: The scoundrel who runs the fake call center smiled