आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 13:14 IST2021-09-02T13:12:45+5:302021-09-02T13:14:13+5:30
महापुराचा मोठा फटका तालुक्यातील खेर्डे गावाला बसला आहे. काल सहकाऱ्यांसह गावातील नुकसानीची पाहणी केली. काही घर वाहून गेली तर पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत.

आधीच शाळा बंद, महापुराने झाली दुर्दशा, भाजप आमदाराने दाखवली दशा
जळगाव - खान्देशातील धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवस झालेल्या पावसामुळे महापूर आला आहे. पुराचे पाणी शहरात, गावखेड्यात घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. चाळीसगाव तालुक्याीतल खेर्डे गावातही शेती आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं आहे. चाळीसगावचे आमदार आणि भाजप नेते मंगेश चव्हाण यांनी भेट दिली. त्यासंदर्भात ट्विटरवरुन फोटोही शेअर केले आहे. यावेळी, बंद शाळांची झालेली दुर्दशाही त्यांनी सांगितली.
चाळीसगाव शहरातील बहुतांश भागाला महापुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. स्थिती गंभीर झाली आहे.प्रशासनाने नदीकाठालगतच्या नागरिकांसाठी नेताजी चौकातील आनंदीबाई बंकट विद्यालयात मदत कक्ष सुरु केला आहे. न.पा.ची टीम यासाठी सर्तक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही शाळांमध्ये नागरिकांना हलविण्यात येत आहे, अशी माहिती तहसीलदार अमोल मोरे यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली. तर, महापुरामुळे शाळांचेही मोठे नुकसान झाले आहे.
महापुराचा मोठा फटका तालुक्यातील खेर्डे गावाला बसला आहे. काल सहकाऱ्यांसह गावातील नुकसानीची पाहणी केली. काही घर वाहून गेली तर पुराचे पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहेत. जि.प. शाळेची देखील अवस्था भयावह झालेली पाहायला मिळाली. शाळेतील महत्वाचा रेकॉर्ड खराब झाल्याने एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीकाठावर असणाऱ्या खळ्यातील छोटी-मोठी जनावरे वाहून गेल्याने पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. येणाऱ्या काळात पुरापासून बचावासाठी काय करता येईल, याची गावातील पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
शाळेतील महत्वाचा रेकॉर्ड खराब झाल्याने एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. नदीकाठावर असणाऱ्या खळ्यातील छोटी - मोठी जनावरे वाहून गेल्याने पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. येणाऱ्या काळात पुरापासून बचावासाठी काय करता येईल याची गावातील पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. pic.twitter.com/CL7aaTfGNa
— Mangesh Chavan (@mlamangeshbjp) September 2, 2021
धुळे शहरालाही पावसाचा फटका
धुळे शहरातील बिलाल मस्जिदजवळील शंभर फुटी रोड, तिरंगा चौक, आझाद नगर, अग्रवाल नगर, मारिया शाळा, नंदी रोड, चित्तरंजन कॉलनी, गजानन कॉलनी, जनता सोसायटी, हजार खोली, जामचा मळा, मौलवी गंज, समता नगर, भाईजी नगर, काजी प्लॉट, देवपूरमधील विटा भट्टी, आधार नगर, अंदरवाली मस्जिद, नेहरू नगर, लक्ष्मीवाडी मिल परिसर व देवपूर तसेच शहरातील विविध भागातील नागरिकांचे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सुमारे दोन हजार कुटुंबांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याबाबत आमदार फारूक शाह यांनी आयुक्त अजीज शेख यांना माहिती दिली व तातडीने पाहणीचे आदेश दिलेत.