शाळा बंद असल्याने मुलांसाेबतच पालकांचे मानसिक आराेग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:36+5:302021-08-24T04:20:36+5:30

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काेराेना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले, मुली घरी बसले ...

As the school was closed, the mental health of the parents along with the children deteriorated | शाळा बंद असल्याने मुलांसाेबतच पालकांचे मानसिक आराेग्य बिघडले

शाळा बंद असल्याने मुलांसाेबतच पालकांचे मानसिक आराेग्य बिघडले

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काेराेना संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले, मुली घरी बसले आहेत. दरम्यान, घरी राहून त्यांना कंटाळा आला असून मुला-मुलींचा खाेडकरपणा व चिडचिडेपणा वाढला आहे. याचा परिणामही पालकांच्या मानसिक आराेग्यावर हाेत आहे.

काेराेना संंसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असून प्राथमिक वर्ग ऑनलाइन भरत आहेत. विद्यार्थी घरीच राहत असून त्यांचे माेबाइल हाताळणे व टीव्ही पाहण्याचे प्रकार वाढले आहेत. पालकांच्या कामात व्यत्यय आणला जात असल्याने पालकही चिडचिड करीत आहेत. एकूणच शाळा बंदमुळे काही शाळकरी मुलांसाेबतच अनेक पालकांचेही मानसिक आराेग्य बिघडल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुक्त गावांमधील शाळा सुरू आहेत. मात्र, शहरातील शाळा, महाविद्यालये कधी उघडणार, ही प्रतीक्षा सर्वांना लागून आहे.

- मुलांच्या समस्या...

घरी राहावे लागत असल्याने एकलकाेंडेपणा वाढला.

चिडचिडेपणा व खाेडकरपणा वाढला.

हट्टीपणा पूर्वीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून येते.

पालकांचे म्हणणे ऐकून न घेता मनमर्जीने वागणे.

- पालकांच्या समस्या...

घरी असलेले शाळकरी मुले त्रास देत असल्याने पालकांचेही वर्तन बदलले आहे.

पालकांच्या वर्तनात चिडचिड व आक्रमकपणा वाढला आहे.

घरच्या कामात मुले हस्तक्षेप करत असल्याने आई-वडिलांवर ताणतणाव येत आहेत.

अशा कराव्या उपाययाेजना

काेराेना संकटामुळे शाळा बंद असून विद्यार्थी घरी बसले आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून दिल्यास मुले, मुलींचे वर्तन चांगले राहण्यास मदत हाेईल. गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी घरी राहत असल्याने शाळेतून मिळणाऱ्या विविध कला काैशल्यापासून ते वंचित आहेत. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या पाल्यांना चित्रकला व विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थी आपल्या कामात व्यस्त राहतील. पालक व विद्यार्थी आपापल्या ठिकाणी व्यस्त राहिल्यास दाेघांचेही मानसिक आराेग्य निराेगी राहण्यास नक्कीच मदत हाेते. त्यादृष्टीने पालकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे मुलांना मित्र-मैत्रींमध्ये खेळायला जाता येत नाही. दुसरीकडे पालकांना सुद्धा आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पालकांना शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी मुलांना पुरवता येत नाहीत. पालक चिंचेत असल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे पालकांनी जास्त वेळ मुलांमध्ये घालवायला हवा. मुले कुठल्या गोष्टीमध्ये रमतील ते करायला हवे. मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्यात जे गुण आहेत, त्याच्याबद्दल प्रोत्साहन दिले जावे. जेणेकरून मुले त्या गोष्टींमध्ये रमतील. मुलांना कौतुक आणि शाबासकीची थाप पालकांनी द्यावी, त्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा कमी होईल.

- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली : ७६५१४

दुसरी : ७९३१३

तिसरी : ७७९१८

चौथी : ८००५०

पाचवी : ७८८२८

सहावी : ७७३११

सातवी : ७७६७७

आठवी : ७६३८५

नववी : ७६३५८

दहावी : ५८३१७

Web Title: As the school was closed, the mental health of the parents along with the children deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.