इकरात विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट प्रोग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 21:48 IST2019-12-16T21:48:31+5:302019-12-16T21:48:43+5:30
जळगाव : इकरा ऊर्दू हायस्कूल, जळगाव आयोजित आणि शासकीय तंत्रनिकेतन व्दारा प्रस्तुत स्कूल कनेक्ट प्रोग्राम शुक्रवारी दुपारी इकरा ऊर्दू ...

इकरात विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट प्रोग्राम
जळगाव : इकरा ऊर्दू हायस्कूल, जळगाव आयोजित आणि शासकीय तंत्रनिकेतन व्दारा प्रस्तुत स्कूल कनेक्ट प्रोग्राम शुक्रवारी दुपारी इकरा ऊर्दू हायस्कूल, सालारनगर येथे उत्साहात पार पडला.
यावेळी शासकीय तंत्रनिकेतन जळगावतर्फे प्रा. सुनिता लांडगे, प्रा. ए. एस. झोपे, डॉ. ए. डी. विखार यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापिका शमीम मलिक, मुख्याध्यापक मुश्ताक मिर्जा, काजी जमीर अश्रफ, अलीम अ. रज्जाक, नाजीम खान, तन्वीर इकबाल, सना महेरीन, अतिक अहेमद खान, डॉ. अनिसुद्दीन शेख, वाजिद पठाण उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेख हारून बशीर तर सूत्रसंचालन रियाज अहमद जाफर शाह यांनी
केले.