जामनेरमध्ये स्कूल बसला अपघात, दोन शिक्षकांसह २५ विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 10:50 IST2023-03-31T10:50:09+5:302023-03-31T10:50:37+5:30
ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता पहूरनजीक घडली.

जामनेरमध्ये स्कूल बसला अपघात, दोन शिक्षकांसह २५ विद्यार्थी जखमी
पहूर : पहूर (ता.जामनेर) येथून शेंदुर्णीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बसचा स्टेअरिंग राँड तुटल्याने झाडावर आदळली. यात दोन शिक्षकांसह २५ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता पहूरनजीक घडली.
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन सकाळी ही बस निघाली होती. पहूर -पाचोरा रस्त्यावर स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस झाडावर आदळून उलटली. बसमध्ये जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थी होते. गंभीर जखमी विद्यार्थ्यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे.