मित्राला बुडताना वाचवलं, पण स्वतःचा जीव गमावला; धुळे तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:23 IST2025-05-22T13:22:17+5:302025-05-22T13:23:26+5:30
इन्साफ आजाद खान (२२) व त्याचा मित्र मयूर मोहन गांगुर्डे (२५, रा. अमळनेर) हे दोघेही धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बीफार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते.

मित्राला बुडताना वाचवलं, पण स्वतःचा जीव गमावला; धुळे तालुक्यातील घटना
डिगंबर महाले -
अमळनेर (जि. जळगाव) : येथील इन्साफ खान या तरुणाने त्याचा मित्र मयूर गांगुर्डे यास वाचविताना स्वत:चा जीव गमावल्याची घटना धुळे तालुक्यातील अवधान शिवारात घडली.
इन्साफ आजाद खान (२२) व त्याचा मित्र मयूर मोहन गांगुर्डे (२५, रा. अमळनेर) हे दोघेही धुळे येथील एसव्हीकेएम महाविद्यालयात बीफार्मसीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होते. दोघेही मित्र मंगळवारी दुपारी अवधान शिवारातील धरणावर गेले होते. यावेळी मयूरचा तोल गेल्याने तो बुडू लागला असताना इन्साफने त्याला वाचविण्यासाठी पुढे जात त्याला हात देत बाहेर काढले, मात्र त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडाला. यावेळी इतरांनी धाव घेत त्यासही पाण्यातून बाहेर काढले; पण तो बेशुद्ध झाला होता. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
इन्साफचा नुकताच झाला होता साखरपुडा
काही दिवसांपूर्वीच इन्साफचा साखरपुडा झाला होता. पुढे लग्न आणि संसार हे सारेच स्वप्न विरले. त्याच्या पश्चात आई- वडील आणि भाऊ अरबाज असा परिवार आहे. वडील आजाद खान हे येथील मुंदडा बिल्डर्समध्ये जेसीबी ठेकेदार
आहेत, तर भाऊ अरबाज हा
इंजिनिअरिंग करीत आहे.