सोसायटीच्या निवडणुकीवरून सरपंच - उपसरपंच भिडले; ५० जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 11:04 IST2022-06-26T11:03:24+5:302022-06-26T11:04:07+5:30
आज विविध कार्यकारी सोसायटीसाठी मतदान होत आहे. यासाठी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोसायटीच्या निवडणुकीवरून सरपंच - उपसरपंच भिडले; ५० जणांविरुद्ध गुन्हा
पारोळा (जि.जळगाव) : विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीतील वादातून सरपंच व उपसरपंच यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटातील ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चोरवड (ता. पारोळा) येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता घडली.
सरपंच राकेश रमेश पाटील व उपसरपंच शैला किरण पाटील या दोन्हींच्या गटामध्ये कोयता, लोखंडी धारदार शस्त्र, लाठ्या -काठ्या घेऊन हाणामारी झाली. दरम्यान, आज विविध कार्यकारी सोसायटीसाठी मतदान होत आहे. यासाठी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याचबरोबर, या निवडणुकीत एका उमेदवाराचा अर्ज परस्पर मागे घेतल्याच्या कारणावरुन दोन जणांविरुद्ध १० दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.