काथार वाणी समाज अध्यक्षपदी संतोष बाविस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 19:04 IST2019-10-13T19:03:05+5:302019-10-13T19:04:32+5:30
काथार वाणी समाज सेवा संघ अध्यक्षपदी संतोष वसंतराव बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

काथार वाणी समाज अध्यक्षपदी संतोष बाविस्कर
पाचोरा, जि.जळगाव : काथार वाणी समाजाच्या अध्यक्षपदी संतोष वसंतराव बाविस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
काथार वाणी समाज सेवा संघाची वार्षिक बैठक नुकतीच उमाकांत वाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत समाजाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी संतोष वसंतराव बाविस्कर जळगाव यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी घोषित झाली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष अजय कामळस्कर, सचिव नीलेश पंडित, सहसचिव संध्या वाणी, सदस्य विजय वाणी, मुकुंद वाणी, अनिल वाणी, संगीता नांदेडकर, विवेक वाणी, सतीश वाणी, अनिल वाणी, मुरलीधर वाणी, शरद वाणी, भानुदास वाणी, प्रकाश वाणी, मनीष वाणी, राहुल हरणे, मनीष वाणी, शीतल वाणी यांचा समावेश आहे.