शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जळगावात रोगराई नियंत्रणासाठी ‘समिती’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:14 PM

मनपाचा महासभा : आरोग्याच्या चर्चेसाठी भाजपाचे ठिय्या आंदोलन

ठळक मुद्देसुरूवातीलाच गदारोळरोगराई नियंत्रणासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू व चिकुनगुनिया सारख्या आजारांमुळे शहरात कधी नव्हे एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने याप्रश्नी अगोदर चर्चा व्हावी या भाजपा सदस्यांच्या मागणीवरून महासभेत गदारोळ झाला. विषय पत्रिकेवरील विषयानंतर सविस्तर चर्चा  करू असे आश्वासन दिल्यावरही या सदस्यांनी  घोषणाबाजी करत व्यासपीठासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी व भाजपा सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. सभेचे विषय संपल्यानंतर रोगराईवर चर्चा झाली. भाजपाच्या नगरसेविका सुचिता हाडा यांच्या नेतृत्वाखाली रोगराई नियंत्रणासाठी समिती स्थापन करण्याचा ठराव एकमताने झाला. मनपाची महासभा महापौर ललित कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपमहापौर गणेश सोनवणे, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, नगर सचिव अनिल वानखेडे आदी होते. सभेच्या प्रारंभीच भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांनी उभे राहून शहरात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया सारख्या आजारांचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला असल्याने या प्रश्नी अगोदर चर्चा व्हावी अशी मागणी केली. सभागृहातील सदस्यांची नावे घेऊन त्याच्या घरातही डेंग्यूचे रूग्ण असल्याचे ते म्हणाले. याप्रश्नी सभेच्या शेवटी चर्चा करू असे महापौर ललित कोल्हे यांनी सांगितले मात्र चर्चा अगोदरच व्हावी या मुद्यावरून भाजपाच्या सदस्यांची उभे राहून घोषणाबाजी सुरू केली. तरीही सभेचे कामकाज सुरू राहिल्याने या सदस्यांनी व्यासपीठाच्या समोर खाली बसून घोषणाबाजी सुरू केली. महापौर ललित कोल्हे, प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे रस्त्यावर उतरून कामे करत आहेत पण कर्मचारी वर्ग काम करत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याची भूमिका विरोधकांच्यावतीने सुचिता हाडा यांनी मांडली. ठेके दिले तेथे व मनपा कर्मचारी आहेत तेथेही तीच परिस्थिती आहे. अनेक तक्रारी केल्या की एका तक्रारीची दखल घेतली जाते. शहरात दोन्ही आमदारांच्या प}ी, सभागृहातील सदस्य, त्यांची मुले डेंग्यूने आजारी होते. केवळ एक दोन व्यक्ती सक्षम असून चालत नाही तर सर्वानी बरोबर येऊन कामे करणे गरजेचे आहे.