वलवाडी रस्त्यावर ट्रॅक्टरची एस. टी. बसला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 19:45 IST2020-11-19T19:44:18+5:302020-11-19T19:45:26+5:30

भडगाव : सुरत पाचोरा एस. टी. बस भडगावकडे जात असताना ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने बसच्या केबीनचे नुकसान झाले.

S. of tractor on Valwadi road. T. Just hit | वलवाडी रस्त्यावर ट्रॅक्टरची एस. टी. बसला धडक

वलवाडी रस्त्यावर ट्रॅक्टरची एस. टी. बसला धडक

ठळक मुद्देबसमधील प्रवाशी बालंबाल बचावले

भडगाव : सुरत पाचोरा एस. टी. बस वलवाडी मार्गाने भडगावकडे जात असताना बसला समोरुन येणाऱ्या स्वराज कंपनीच्या भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने बसच्या केबीनचे नुकसान झाले. मात्र या अपघातात कुणीही जखमी न होता प्रवाशी बालंबाल बचावले. बसचालकाला मुका मार लागला आहे. ही घटना दि. १८ रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वलवाडी भडगाव रस्त्यावर खाऱ्या नाल्याजवळ घडली. याबाबत एस. टी. बसचालक विनोद हिलाल देवरे पाचोरा डेपो यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भडगाव पोलीस स्टेशनला स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरवरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरत पाचोरा एस. टी. बस (एमएच २०-बीएल ३७५९) ही बस वलवाडी मार्गाने भडगावकडे येत असताना वलवाडी गावापुढील खाऱ्या नाल्याजवळ समोरुन भरधाव वेगाने धावणाऱ्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरने एस. टी. बसला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या केबीनचे नुकसान झाले. या अपघातात बसमध्ये बसलेले १० ते १२ प्रवाशी बालंबाल बचावले. एकही प्रवाशाला दुखापत झाली नाही  बसचालक विनोद देवरे यांना मुका मार लागला. बसचालकाच्या सतर्कतेने बसमधील प्रवाशांचा जीव वाचला.

घटनास्थळी नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. भडगाव पोलीस स्टेशनला विनोद देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरवरील चालकाविरुद्ध भारतीय दंड विधान कलम २७९, ३३७, ४२७, एमव्ही ॲक्ट १८४, १३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे हे करीत आहेत.

Web Title: S. of tractor on Valwadi road. T. Just hit