जळगावात भरधाव डंपर ट्रॅव्हल्सवर धडकले; २७ प्रवासी गंभीर जखमी

By सुनील पाटील | Updated: August 1, 2024 16:19 IST2024-08-01T16:19:24+5:302024-08-01T16:19:40+5:30

जखमींना खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Rush hits Dumper Travels in Jalgaon; 27 passengers seriously injured | जळगावात भरधाव डंपर ट्रॅव्हल्सवर धडकले; २७ प्रवासी गंभीर जखमी

जळगावात भरधाव डंपर ट्रॅव्हल्सवर धडकले; २७ प्रवासी गंभीर जखमी

जळगाव : भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २५ प्रवाशांसह दोन्ही वाहनाचे चालक जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता वावडदा-वडली रस्त्यावर झाला. जखमींना खासगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ ट्रॅव्हल्स ( क्र.एमएच १९ वाय ३३५९) पाचोऱ्याकडून जळगावला येत होती तर कडीचा कच भरुन डंपर वावडदाकडून वडलीकडे भरधाव वेगाने जात असताना वळणावर डंपरने (एम.एच.१९ सी.एक्स २५७७) बसला जोरदार धडक दिली. त्यात बस एका दिशेने चक्काचूर झाली. तर डंपरही चालकाच्या दिशेन चक्काचूर झाला. यात बसमधील २५ प्रवाशांसह चालक व क्लिनर जखमी झाला तर डंपरचा चालकही जखमी झाला. अपघाताचे वृत्त कळताच वडली व वावडदा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिका तसेच मिळेल त्या वाहनाने सरकारी व खासगी रुग्णालयात रवाना केले. यातील २५ जणांवर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. म्हसावद दूरक्षेत्राच्या पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.


असे आहेत जखमी
सरुबाई विठ्ठल केळकर (वय ६०,रा.पाथरी, ता.जळगाव), संदीप सुधाकर सोनगे (वय २०,रा.बांबरुड राणीचे, ता.पाचोरा), सुवर्णा भूषण पाटील (वय २८), रंजना पुना पाटील (वय ४५), आशा अशोक पाटील (वय ४०), आक्का वसंत पाटील (वय ५०), मनिषा विनोद पाटील (वय ३८), सुरेखा नरेंद्र पाटील (वय ३८), प्रवीण सुरेश पाटील (वय ३५), संजय महाजन (वय ५०), वैभवी दादाभाऊ पवार (वय १६) सर्व रा.नांद्रा. ता.पाचोरा),  सराबाई विठ्ठल देवकर (वय ६५, रा.वावडदा), इंदूबाई बिरबल राठोड (वय ३६) करण बिरबल राठोड (वय १८, रा.धानवड, ता.जळगाव), अंजना श्रीकृष्ण माळी वय ४५),श्रीकृष्ण माळी (वय ५३ कुऱ्हाड, ता.पाचोरा), नितीन सुभाष पाटील (वय ३५,रा.वडली,) अशोक महारु राठोड (वय ३२), सिंधूबाई पाटील (वय ६५), प्रकाश वसंत बोरसे (वय ५६), रवींद्र अर्जुनसिंग राजपूत (वय ५५), शिवनंदन शालिक पवार (वय ३०), प्रतिक संजय खेडकर (वय ३६), पुजा कैलास पाटील (वय ३८)व वंदना सूर्यकांत धनगर (वय ४०)

Web Title: Rush hits Dumper Travels in Jalgaon; 27 passengers seriously injured