Rotary club inspects 3 people | रोटरी क्लबतर्फे ५६५ जणांची आरोग्य तपासणी
रोटरी क्लबतर्फे ५६५ जणांची आरोग्य तपासणी

जळगाव : रोटरी क्लबतर्फे पद्मालय - एरंडोल रस्त्यावरील जहागिरदार आयुर्वेद, कृषी व पर्यटन केंद्र येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात ५६५ जणांची तपासणी करण्यात आली़ यात औषधी व चष्मे वितरण करण्यात आले. दरम्यान, गरजू ५५ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रोटरी क्लब जळगावच्या सहकार्याने केली जाणार आहे़
या शिबिरात डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, डॉ. हेमांगी शहा, डॉ. निकुंज गुजराथी यांनी नेत्र तपासणी तर हाडांची तपासणी डॉ. शांताराम तळेले, डॉ. नेमाडे, डॉ. श्रेया बर्वे यांनी केली. डॉ. प्रदिप जोशी यांनी मानसिक आरोग्य तपासणी तर डॉ. शशिकांत गाजरे यांनी हृदयविकार व किडनी आजाराविषयी तपासणी केली. डॉ. जयंत जहागिरदार व डॉ.आदित्य जहागिरदार यांनी आयुर्वेद निदान व उपचार केले. दातांची तपासणी डॉ. रोहन बोरोले, डॉ.कृतिका अडवानी, डॉ. वर्षा रंगलानी यांनी केली. पोटाचे विकार व जनरल तपासणी डॉ. पराग जहागिरदार यांनी केली. विजय जोशी, प्रकाश चौधरी, डॉ.निलेश सोनवणे यांनी मोफत औषधी दिली.

Web Title: Rotary club inspects 3 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.