शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
4
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
5
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
6
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
7
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
8
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
9
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
10
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
11
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
12
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
13
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
14
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
15
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
16
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
17
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
18
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
19
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
20
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस

लेकीच्या कारवर हल्ला, मुंबईला निघालेल्या एकनाथ खडसेंनी नाशिकहूनच वळवली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 10:20 PM

रोहिणी खडसे-खेवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम अटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत असतांना सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केला.

मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर २७ रोजी रात्री हल्ला झाला. त्या कारमधून जात असताना  मोटरसायकलस्वार अज्ञातांनी हल्ला करून कारची काच फोडत गाडीचे इतर नुकसान करुन पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास तालुक्यातील माणेगाव ते कोथळी दरम्यान  घडली. सुदैवाने या प्राणघातक हल्ल्यात त्यांना काहीही इजा झाली नाही. 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा बॅंकेच्या विद्यामान संचालिका तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे या चांगदेव येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून मुक्ताईनगरकडे घरी परत येत असताना माणेगाव फाट्यावर अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या वाहनावर ( एमएच १९/ सी सी १९१९)र समोरून हल्ला केला. गाडीवर रॉडने वार केल्याचे सांगितले जात आहे. यात वाहनाचा दर्शनी काच फुटला आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहे. दरम्यान, रोहिणी खडसे ज्या बाजूने वाहनात दर्शनी बाजूला बसल्या होत्या, त्याच बाजुचा काच फुटला आहे. सुदैवाने रोहिणी खडसे व ड्रायव्हर या हल्ल्यातून सुखरूप बचावले आहेत. रात्री उशिरा पर्यंत याबाबत घटनास्थळी तपासकार्य सुरू होते.

राजकीय वादाबाबत चर्चादोन दिवसांपासून खडसे तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याचबरोबर शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनीही एकमेकांवर बदनामी आदी आरोप करीत गुन्हे दाखल केले आहे. एकूणच राजकीय वातावरण मुक्ताईनगर तालुक्यात तापले असताना ही घटना घडली. यामुळे या घटनेला राजकीय किनार तर नाही ना? अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरु आहे.

रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दीही घटना घडल्यानंतर रोहिणी खडसे या आपल्या घरी पोहचल्या असता लगेचच समर्थकांनी एकच गर्दी केली. स्वत:ला सावरत  त्यांनी बराच वेळ थांबून असलेल्या कार्यकर्त्यांची भेट घराबाहेर येऊन घेतली. यावेळी खासदार रक्षा खडसे, दूध संघाच्या अध्यक्षा  मंदाकिनी खडसे व स्वीय सहायक योगेश कोलते हे या ठिकाणी आले. याप्रसंगी कोलते यांनी रोहिणी खडसे यांची मनस्थिती ठिक नसल्याने आज गुन्हा दाखल केलेला नाही, मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सर्व कार्यकर्त्यांनी जमावे असे आवाहन केले. आमचा लढा कोणत्या पक्षा विरुद्ध नसून प्रवृत्तींविरुद्ध आहे तसेच विधानसभेत रडक्या आवाजात सुरक्षा मागणाऱ्यांनी तर अशा भ्याड हल्ल्याचे आदेश दिले नाही ना? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. प्रशासन व सरकार त्यांचे काम करेल, कार्यकर्त्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन कोलते यांनी केले. दरम्यान एकनाथ खडसे हे मुंबईला जात असताना घटना कळताच नाशिक येथून मुक्ताईनगरकडे परतले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेRohini Khadseरोहिणी खडसेJalgaonजळगावPoliceपोलिस