जामनेरमध्ये एलआयसीच्या कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला, साडेपाच लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 13:03 IST2018-08-13T12:58:12+5:302018-08-13T13:03:20+5:30
शनिवारी रात्री ही घटना घडली असून चोरट्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराही फोडला.

जामनेरमध्ये एलआयसीच्या कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला, साडेपाच लाखांची रोकड लंपास
जळगाव - जामनेरमधील यश कॉप्लेक्सच्या तळमजल्यावर असलेल्या एलआयसीच्या कार्यालयाचे कुलुप तोडून चोरट्यांनी कपाटातील साडेपाच लाखांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून चोरट्यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेराही फोडला.
रविवारी एलआयसीच्या कार्यालयाला सुट्टी असल्याने चोरीचा प्रकार लक्षात आला नाही. मात्र दुपारी या घटनेची माहिती मिळताच शाखा व्यवस्थापकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. सोमवारी (13 ऑगस्ट) सकाळी पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच श्वान पथकाला बोलाविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात शहरातील पाच दुकाने चोरट्यांनी फोडली होती.