शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दिवसाढवळ्या स्टेट बँकेत दरोडा, दरोडेखोरांनी ३.५ कोटींचे सोने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 9:51 AM

घटना सकाळी ९:३० ते १०:३० वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

जळगाव : गुरुवारी दिवसाढवळ्या जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये दोन जणांनी दरोडा टाकला. या दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून बँकेतून सुमारे १७ लाख रुपयांची रक्कम आणि साडेतीन कोटींचे सोने घेऊन पसार झाले आहेत. सकाळी ९:३० ते १०:३० वाजता घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

हेल्मेट घातलेल्या दोन दरोडेखोरांनी स्टेट बँकेमध्ये प्रवेश केला. सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्यांना चाकूच्या जोरावर बंधक बनविले. नंतर बँक व्यवस्थापकालादेखील मारहाण केली. कॅश रूम उघडल्यावर व्यवस्थापक आणि एका दरोडेखोरामध्ये झटापट झाली. त्यात दरोडेखोराने व्यवस्थापकाच्या पायावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. नंतर १७ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले, तसेच दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरसुद्धा सोबत नेला आहे.  घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर तपासाला वेग दिला.  रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांकडून तपासले जात आहेत.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाJalgaonजळगाव