जामनेर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 12:59 IST2018-09-24T12:59:01+5:302018-09-24T12:59:46+5:30
दरोड्याचा कट उधळून लावत जामनेर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

जामनेर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट
जळगाव - दरोड्याचा कट उधळून लावत जामनेर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जिवंत काडतूस -हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी (24 सप्टेंबर) पहाटे जामनेरनजीक एका पेट्रोलजवळ ही कारवाई करण्यात आली.
पाच जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास पाटील व सहकाऱ्यांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील एकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. संशयितांकडून तीन मोटरसायकल, दोन जिवंत काडतूस, एक कट्टा, 6 मोबाईल, धारदार शस्त्र आणि दरोडयासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आले आहे.