शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:59 AM

शहरवासियांची वाट बिकट : चार महिने पुन्हा तीच समस्या राहणार

जळगाव : गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात जळगावकरांना मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा समस्येला तोंड द्यावे लागले होते. निदान वर्षभराच्या काळानंतर ही समस्या मार्गी लागून यंदाच्या पावसाळ्यात तरी रस्त्यांची समस्या निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जळगावकरांना होती. मात्र, पहिल्याच पावसात जळगावकरांची अपेक्षा पाण्यात गेली असून, पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही जळगावकरांची वाट बिकटच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.आॅगस्ट २०१८ मध्ये शहराचा वर्षभरात चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन देत मनपात सत्ता प्राप्त केलेल्या भाजपला आपल्या २२ महिन्यांच्या कार्यकाळात शहराच्या समस्या सोडविण्यास पुर्णपणे अपयश आले आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून नवीन रस्त्यांचे काम होवू शकलेले नाही. त्यातच जे रस्ते आहेत. त्याची साधी दुरुस्तीही मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना करता आलेली नाही. गेल्यावर्षी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे शहरातील उद्योजक बोरोले यांचा चित्रा चौकात अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, ढीम्म मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी यावर्षीही रस्त्यांचा समस्येकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असून, यंदाही मनपा प्रशासन रस्त्यांचे कामे करण्यासाठी शहरात आणखीन मृत्यूंची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.मंगळवारी व बुधवारी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. अमृत योजनेचेही काम बंद असल्याने पदाधिकाºयांना आता ‘अमृत’ च्या कामांना दोष देता येणार नाही. कारण रस्त्यांच्या मधोमध खड्डे झाले आहेत. नवसाचा गणपती मागील रस्ता, रायसोनी नगर, जिजाऊ चौक, गाडगेबाबा चौक, गणेश कॉलनी चौक, एसएमआयटी महाविद्यालय ते नवीन बजरंग बोगदा रस्ता, शिवाजीनगर, दुध फेडरेशन समोरील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आह. मात्र, मनपाकडून लॉकडाऊनचे कारण सांगत या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.मनपाकडून वर्षभर रस्त्यांची समस्या मार्गी लावता येत नाही. मात्र, रस्त्यांबाबत मनपा प्रशासन व सत्ताधाºयांना घेरल्यानंतर खड्डयांमध्ये मुरूम टाकून समस्येवर पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी व मनपा प्रशासनाकडून केले जात असते.तीच समस्या पुन्हा एकवेळदोन महिन्यांपासून कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच थांबून होते. मात्र,आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात असून, शहरातील बाजारपेठा हळूहळू उघडण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत आता शहरातील रस्त्यांवर पुन्हा रेलचेल वाढणार आहे. मात्र, गेल्या वर्षाची रस्त्यांची समस्या जळगावकरांना भेडसावणार आहे. त्याचे ‘ट्रेलर’ पहिल्याच पावसात दिसून गेले आहे. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर रस्त्यांची पुर्णपणे वाट लागली आहे.१०० कोटींतून एक दमडीचाही खर्च नाहीमनपात सत्ता संपादन गेल्यानंतर १६ आॅगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला नगरोथ्थातंर्गत १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, वर्षभर मनपातील सत्ताधारी भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा निधी खर्च करता आला नाही. निधी जाहीर होवून २२ महिन्यांचा काळ होवून ही या निधीतून एक दमडीचाही खर्च सत्ताधाºयांना करता आलेला नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव