शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातात वर्षभरात १२,५६५ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 03:42 IST

राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत ३२ हजार ८७६ रस्ते अपघात झाले.

- सुनील पाटील जळगाव : राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीत ३२ हजार ८७६ रस्ते अपघात झाले. त्यात १२ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दरवर्षी अपघातात १० टक्के घट होणे अपेक्षित आहे, राज्यात अपघातात ८ तर जिल्ह्यात ९ टक्के घट झाली आहे.

२०१९ मध्ये सर्वाधिक २ हजार ८५६ अपघात मुंबईत झाले. त्यात ४०५ जण ठार झाले. सर्वात जास्त ८७३ जण औरंगाबाद जिल्ह्यात तर त्याखालोखाल ८५५ जण पुणे जिल्ह्यात ठार झाले आहेत. नाशिक जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून तेथे ७८३ जणांचा मृत्यू झाला.सोलापूर जिल्ह्यात १ हजार ६५ अपघातात ५३१ जण ठार झाले आहेत. जळगाव जिल्हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. ८३५ अपघातात ४५४ जण ठार झाले. २०१८ मध्ये राज्यात ३५ हजार ७१७ अपघात झाले होते, त्यात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू तर ३१ हजार २६५ जण जखमी झाले होते.

तरुणांचीच सर्वाधिक संख्या

अपघातात ४० वर्षांच्या आत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. चिंतेची बाब म्हणजे महामार्गावरच सर्वाधिक अपघात झाले आहेत.अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वेळोवेळी महामार्गावर नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मोहीम राबविण्यात येते.

आता हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. खड्डे व खराब रस्त्यामुळेच सर्वाधिक अपघात झालेले आहेत. त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत.- डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Accidentअपघातroad transportरस्ते वाहतूकMaharashtraमहाराष्ट्रJalgaonजळगावDeathमृत्यू