जळगाव येथे अंत्ययात्रेला येणाऱ्या रिक्षाला ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:01 IST2018-11-28T22:00:09+5:302018-11-28T22:01:45+5:30
पंचक,ता.चोपडा येथून येत जळगाव येथे नातेवाईकांकडे अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी रिक्षाने येत असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन एक महिला ठार तर अकरा जण जखमी झाले.

जळगाव येथे अंत्ययात्रेला येणाऱ्या रिक्षाला ट्रकची धडक
जळगाव : पंचक,ता.चोपडा येथून येत जळगाव येथे नातेवाईकांकडे अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी रिक्षाने येत असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन एक महिला ठार तर अकरा जण जखमी झाले. अपघात बुधवारी दुपारी तीन वाजता कोळन्हावी, ता.यावल फाट्याजवळ झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या महिलेचे नाव दुर्गाबाई पोपट चव्हाण (वय ६५, रा.पंचक, ता.चोपडा) असे आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील आंबेडकरनगरात पुंडाबाई सोनवणे यांचे निधन झाले होते. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दुपारी होते. त्यासाठी पंचक येथील नातेवाईक प्रवासी रिक्षातून जळगाव येथे येण्यास निघाले होते. कोळन्हावी फाट्याजवळ जळगाव येथून चोपड्याकडे जात असलेल्या ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात पुष्पा प्रविण सोये (वय २३), मिराबाई विकास चव्हाण (वय ३५) ,सखूबाई नाना सोये (वय ३५),आशाबाई विठ्ठल शिरसाठ (वय ४०),सोजाबाई यादव सोये (वय ६८), अलकाबाई प्रविण चव्हाण (वय ४४), प्रताप भावडू सोये (वय ५३), वंदना सतिष वाघ (वय ३३), रमाबाई सुरेश सोनवणे (वय ४२), आरती प्रल्हाद सोये (वय २९), दुर्गाबाई पोपट चव्हाण (वय ६५),हिराबाई अरुण सपकाळे (वय ५५) (सर्व रा.पंचक ता.चोपडा) हे जखमी झाले.