रिक्षा, ओमनीची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 21:36 IST2020-02-03T21:35:55+5:302020-02-03T21:36:07+5:30

धामणगाव फाट्याजवळी घटना : दोन जण गंभीर जखमी

 Rickshaw, Omni face to face | रिक्षा, ओमनीची समोरासमोर धडक

रिक्षा, ओमनीची समोरासमोर धडक

जळगाव- धामणगाव फाट्याजवळ रिक्षा व ओमनी कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली़ या अपघातात रिक्षातील राजेंद्र अंकूश कोळी व संदीप भागवत कोळी (दोन्ही रा़ विदगाव) असे जखमींची नावे आहेत.

राजेंद्र कोळी व संदीप कोळी हे दोघी सोमवारी दुपारी रिक्षातून जळगावहून विदगावकडे जात होते़ मात्र, धामणगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ओमनीकारने रिक्षाला धडक दिली़ यात राजेंद्र आणि संदीप दोघेही जखमी झाले़ त्यांना त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Web Title:  Rickshaw, Omni face to face