शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्‍यासाठी पैसे न दिल्याने रिक्षा चालकाच्या डोक्यात मारली फरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग येऊन एकाने रिक्षाचालक मोहसीन बेग अफसर बेग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग येऊन एकाने रिक्षाचालक मोहसीन बेग अफसर बेग (२९, रा. गेंदालाल मिल) यांच्या डोक्यात फरशी मारून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी रात्री १२.३० वाजता गेंदालाल मिल भागात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

गेंदालाल मिल येथे मोहसीन बेग हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. रिक्षा चालवून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी रात्री प्रवाश्यांना सोडून ते घरी परतले. रिक्षा घराजवळ उभी करून घराकडे जात असताना, त्यांना वाटतेचं ‍फिरोज शहा याने अडविले व दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. बेग यांनी पैसे नसल्याचे त्यास सांगितले. याचा राग येऊन त्याने बेग यांना बेदम मारहाण केली. नंतर जवळच असलेली फरशी उचलून ती बेग यांच्या डोक्यात तीन वेळा मारली. त्यामुळे डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव होऊन ते गंभीर जखमी झाले. नंतर कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून शहर पोलीस ठाण्‍यात ‍फिरोज शहा (रा.गेंदालाल मिल) याच्याविरुध्‍द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. दरम्यान, त्यांना मारहाण होत असताना त्यांच्या खिशातील बारा हजार रुपये गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.