पारोळा तालुक्यात अज्ञात वाहनाची धडक रिक्षाचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:44 IST2020-01-28T17:41:56+5:302020-01-28T17:44:09+5:30
भोकरबारी फाट्याजवळ रिक्षाला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. त्यात ६० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला

पारोळा तालुक्यात अज्ञात वाहनाची धडक रिक्षाचालकाचा मृत्यू
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील भोकरबारी फाट्याजवळ रिक्षाला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. त्यात ६० वर्षीय चालकाचा मृत्यू झाला तर तीन महिला जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
पारोळ्याकडून अमळनेरकडे जाणारी रिक्षा (एमएच-१९-एई-१२४८) जात होती. तेव्हा समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचालक सुपडू गजमल पाटील (वय ६०, रा.अमळनेर) यांचा मृत्यू झाला तर रिक्षामधील प्रवासी कलाबाई जगन्नाथ, प्रवासी कलाबाई जगन्नाथ पाटील रा.होळपिंप्री, ता.पारोळा, लताबाई बापूराव पाटील रा.होळपिंप्री, ता.पारोळा, द्वारकाबाई निंबा पाटील रा.रत्नापिंप्री, ता.पारोळा हे जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून तत्काळ कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर वाहनचालक आपली गाडी घेऊन फरार झाला. याबाबत दीपक राजेंद्र पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र रावते करीत आहे.