न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेण्यासाठी फिर्यादीला लावली रिव्हॉल्वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 14:03 IST2019-05-05T13:28:55+5:302019-05-05T14:03:24+5:30
खुनाच्या गुन्ह्याची न्यायालयात सुरू असलेली केस मागे घ्यावी यासाठी भूषण वासुदेव सोनवणे याने छातीला व डोक्याला रिव्हॉल्वर लावून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादी अनिल सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.

न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेण्यासाठी फिर्यादीला लावली रिव्हॉल्वर
जळगाव - खुनाच्या गुन्ह्याची न्यायालयात सुरू असलेली केस मागे घ्यावी यासाठी भूषण वासुदेव सोनवणे (रा.रामेश्वर कालनी )याने छातीला व डोक्याला रिव्हॉल्वर लावून ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खुनाच्या गुन्ह्यातील फिर्यादी अनिल सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन भूषण सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री आठ वाजता मेहरुणमध्ये ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रात्री साडे बारा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आपण असा प्रकारच केला नसल्याचा दावा भूषण सोनवणे यांनी केला आहे. पोलिसांनी चौकशी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासावे, असेही भूषण यांचे म्हणणे आहे.