साकेगाव येथे जनता कर्फ्यूला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 22:22 IST2020-10-06T22:22:03+5:302020-10-06T22:22:09+5:30
कोरोनाबाबत खबरदारी

साकेगाव येथे जनता कर्फ्यूला प्रतिसाद
भुसावळ : बशहराजवळील साकेगाव येथे दर मंगळवारी जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ६ रोजी गावातील सर्व दुकानदारांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. यामुळे कोरोना साखळी तोडण्यास नक्कीच मदत मिळेल. गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० पेक्षा जास्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनातर्फे निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.