'Reserved' Corporacies Disaster Crisis | ‘राखीव’ नगरसेवकांवर अपात्रतेचे संकट
‘राखीव’ नगरसेवकांवर अपात्रतेचे संकट

जळगाव : डिसेंबर २०१६ मध्ये निवडणुका झालेल्या जिल्ह्यातील १२ पालिकांमधील राखीव गटातून निवडून आलेल्या बहुतांश नगरसेवकांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई होण्याचे संकेत आहेत. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
डिसेंबर २०१६ मध्ये जिल्ह्यातील १२ पालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. या पालिकांमध्ये राखीव वॉर्डातून नगरसेवक विजयी झालेले आहेत. पूर्वी निवडणुकीचे नामनिर्देशन करताना प्रमाणपत्र द्यावे लागत असे. मात्र त्यात बदल होऊन सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र द्यावे लागत असे. त्यातही बदल होऊन हा कालावधी १२ महिन्यांचा करण्यात आला.
मात्र डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका, परिषदांमध्ये राखीव गटातून अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देऊनही अनेकांनी अद्याप ते सादर न केल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात येऊन मे महिन्याअखेरपर्यंत पुन्हा मुदत देण्यात आली होती मात्र अद्यापही अनेकांनी हे प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले आहे.
अहवाल मागविला
पालिकांकडून जिल्हा प्रशासनाने राखीव गटातील नगरसेवकांची माहिती मागविली आहे. तसेच कोणी, कोणी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यांच्या याद्या बनविणेही सुरू असून अनेकांचे नगरसेवकपद यामुळे धोक्यात आले आहे.


Web Title:  'Reserved' Corporacies Disaster Crisis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.