शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

बारदानाअभावी पुन्हा तूर खरेदी बंद

By admin | Updated: March 28, 2017 00:04 IST

जामनेर : तूर उत्पादक शेतकरी हैराण!

जामनेर : तालुक्यातील शेतक:यांनी बाजार समिती आवारात आणलेल्या तुरीची खरेदी बारदानाअभावी पुन्हा बंद झाली आहे, त्यामुळे  उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत.दरम्यान, गेल्या आठवडय़ात शेतकी संघाचे चेअरमन यांनी समितीच्या आवारात तूर भरलेले अनेक ट्रॅक्टर उभे असल्याने त्यांची मोजणी होईर्पयत नव्याने तूर आणू नये, असे आवाहन केले होते.  तथापि पुन्हा बारदानांचा प्रश्न उद्भवल्याने  ज्यांनी आधीच  तूर आणून ठेवली त्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, बारदानासह अन्य समस्यांची सोडवणूक होईर्पयत तूर आणण्यास मनाई करण्यात आली असली तरी गुरुवारी रात्री तुरीच्या तब्बल तीनशे गोण्या काही संचालकांनी आणून टाकल्याचे बोलले जात असून ते गौडबंगाल कायम आहे. नियम पाळण्याचे बंधन जसे शेतक:यांना घालण्यात आले, तोच नियम संचालकांना का नाही? असा सवाल केला  जात आहे.  वशिलेबाजी करून व केवळ पैसा कमावण्याच्या हेतूने बाजार समितीमध्ये रात्रीतून आणलेली तूर मोजणीसाठी घेऊ नये अशी मागणी शेतक:यांकडून केली जात आहे. एका शेतक:याची जास्तीत जास्त 15 ते 20 क्विंटल तूर मोजली जात असताना एखादा संचालक एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तूर आणतोच कशी? अशी चर्चा असतानाच आता तर बारदानांअभावी तूर मोजणीत पुन्हा खंड पडला आहे.            (वार्ताहर)