चौथ्या दिवशी दिलासा: २९ अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 19:01 IST2020-04-27T19:00:58+5:302020-04-27T19:01:57+5:30
जळगाव : गेल्या तीन दिवसात १२ रूग्ण आढळल्यानंतर चौथ्या दिवशी सायंकाळी धुळे येथून प्राप्त झालेले २९ अहवाल निगेटीव्ह आलेले ...

चौथ्या दिवशी दिलासा: २९ अहवाल निगेटीव्ह
जळगाव : गेल्या तीन दिवसात १२ रूग्ण आढळल्यानंतर चौथ्या दिवशी सायंकाळी धुळे येथून प्राप्त झालेले २९ अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत़ सोमवारी कोरोना रूग्णालयातून ५२ जणांचे नमुने पाठविण्यात आल्याची माहिती आहे़ सोमवारच्या नमुन्यांसह एकत्रित शंभरावर अहवालांची प्रतिक्षा आहे़ दरम्यान, सोमवारी अमळनेर येथील बाधित रूग्णाच्या संपर्कातील संशयित रूग्ण ९० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला़ त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे़