जळगाव जिल्ह्यात 146 तलाठी सजाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 06:41 PM2017-08-27T18:41:34+5:302017-08-27T18:49:08+5:30

शासनाचा निर्णय : शेतकरी व जनतेचे हाल थांबणार

Recognition of 146 Talathi decorations in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात 146 तलाठी सजाला मान्यता

जळगाव जिल्ह्यात 146 तलाठी सजाला मान्यता

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाने 29 जून रोजी पाठविला होता शासनाकडे अहवालप्रारूप मसुदा 16 ऑगस्ट रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध 31 ऑगस्टर्पयत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात आल्या हरकती

ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.27 - जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण यामुळे शासनाने जिल्ह्यात 146 तलाठी सजा व मंडळ कार्यालयाची निर्मिती केली आहे. त्यात जळगाव तालुक्यात 15 व धरणगाव तालुक्यात 20 तलाठी सजाची निर्मिती झाली आहे. या निर्णयामुळे शेतक:यांचे व जनतेचे हाल थांबणार आहेत.
तलाठी सजाची पुर्नरचना व विभाजन करून नवीन तलाठी सजा तयार करण्यासाठी नकाशे व सिमा निश्चित करण्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने 29 जून रोजी शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार प्रारूप मसुदा 16 ऑगस्ट रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. 31 ऑगस्टर्पयत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत हरकती मागविण्यात आल्या आहेत. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तलाठी सजाच्या पुर्नरचनेसाठी पाठपुरावा केला होता.
नवीन तलाठी सजा पुढील प्रमाणे. जळगाव तालुका : निमखेडी (निमखेडी, सावखेडा बुद्रुक), आसोदा-2 (आसोदा-1, खेडी बुद्रुक शिव, तरसोद शिव व जळगाव शहराची शिव),  खेडी खुर्द (खेडी खुर्द, फुफनगरी, वडनगरी), कुसुंबा , नशिराबाद 2 (जळगाव खुर्द, बेळी, कडगाव, भादली, नशिराबाद, तरसोद व बेळी), धानवड (धानवड, देव्हारी), बेळी (बेळी, निमगाव बुद्रुक, भागपूर), शिरसोली प्र.बो., वावडदा (वावडदा, बिलखेडा, बिलवाडी,रामदेववाडी), किनोद (किनोद, कठोरा, फुपणी, देवगांव), जळगाव शहर : मेहरुण (मन्यारखेडा शिवार,जळगाव-3, कुसुंबा शिवार, मेहरुण-1 व 3), पिंप्राळा-2 (शिरावली जळगाव रस्ता, सावखेडा बुद्रुक, सावखेडा रस्ता, सावखेडा बुद्रुक), मेहरुण-3, मेहरुण-2, मोहाडी, कुसुंबा बुद्रुक, शिरसोली),जळगाव-2 (आसोदा शिव, आव्हाणे, आसोदा शिव, ममुराबाद शिव, जळगाव-3 (आसोदा,मन्यारखेडा, जळगाव-1, आसोदा, मेहरुण-2, खेडी बुद्रुक).
धरणगाव तालुका : वराड बुद्रुक (वराड बुद्रुक, वराड खुर्द), वाघळुद बुद्रुक (वाघळुद खुर्द व हणुमंतखेडा बुद्रुक), टहाकळी खुर्द (टहाकळी खुर्द, फुलपाट व आव्हाणी). धरणगाव शहर - धरणगाव-1 (गारखेडा, बाभळे बुद्रुक, बांभोरी बुद्रुक, पिंपळे बुद्रुक, पिंपळे खुर्द, बाभळे खुर्द व धरणगाव-2, धरणगाव-2 (भोणे बुद्रुक, सारवे खुर्द, जांभोरा, बोरगाव बुद्रुक, महंकाळे) या तलाठी सजाचा समावेश आहे.

Web Title: Recognition of 146 Talathi decorations in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.