दिराने भावजईवर बलात्कार करून केला खून, कुंझर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:36 IST2018-07-05T13:36:15+5:302018-07-05T13:36:35+5:30

दिराच्या कृत्यात सासूचाही सहभाग

raped and murdered incident | दिराने भावजईवर बलात्कार करून केला खून, कुंझर येथील घटना

दिराने भावजईवर बलात्कार करून केला खून, कुंझर येथील घटना

चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील २६ वर्षीय विवाहितेवर तिच्याच दिराने बलात्कार करुन तिचा खून केल्याची घटना उघड झाली असून दिराच्या या पाशवी कृत्यात मयत विवाहितेची सासू व आजेसासूचाही सहभाग असल्याने तिघांविरुद्ध गुरुवारी मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
कुंझर येथील २६ वर्षीय विवाहितेचा पती सैन्यात असून ती कुंझर येथे सासू व दिरासह राहत होती. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला होता. पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरली.
विवाहितेचा दीर प्रविण छगनदास बैरागी (वय २४) याने विवाहितेवर बलात्कार केल्याचे उघड झाले असून प्रविणची आई आणि विवाहितेची सासू भिलाबाई छगनदास बैरागी तिची सासू (मयत विवाहितेची आजेसासू) विमलबाई भिकन बैरागी यांनी तिचा गळा दाबून मारले. नंतर प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय दिलीप शिरसाट करीत आहे.

Web Title: raped and murdered incident