लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस १२ वर्षे सश्रम कारावास

By संजय पाटील | Updated: April 10, 2023 20:24 IST2023-04-10T20:23:56+5:302023-04-10T20:24:01+5:30

अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर.  चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला. 

Rape of a minor girl with the lure of marriage; 12 years rigorous imprisonment for the accused | लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस १२ वर्षे सश्रम कारावास

लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस १२ वर्षे सश्रम कारावास

अमळनेर, जि.जळगाव  : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केले. होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या शरद सखाराम भिल ( २४,नारणे, ता.धरणगाव) यास बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. आर.  चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला. 

नारणे येथील रहिवासी शरद भिल  हा चोपडा तालुक्यात  ट्रॅक्टरचालक म्हणून काम करीत होता.  पत्नी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेलेली होती. चहार्डी येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीचा रोज पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालायचा आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवायचा.

यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. मात्र नंतर आरोपी शरद याने बाळाला स्वीकारण्यास आणि  पीडित तरुणीशी लग्न करण्यासही नकार दिला. 
यामुळे  चोपडा शहर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुध्द  १९ जून २०२० रोजी पोक्सो कायद्यान्वये  बलात्कार व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता.

Web Title: Rape of a minor girl with the lure of marriage; 12 years rigorous imprisonment for the accused