शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

जळगाव समाज कल्याण सहायक आयुक्ताविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 4:53 PM

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त योगेश सुभाषराव पाटील (रा.गणपती नगर, जळगाव मुळ रा.चाळीसगाव) याच्याविरुध्द सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात तरुणीला मारहाण करुन घराबाहेर हाकलून लावणारी योगेशची पत्नी व वडील सुभाषराव पाटील यांच्याही विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्दे तरुणीला दाखविले लग्नाचे आमिषपत्नी व वडीलांविरुध्दही तक्रारआधी लग्न झालेले असताना दुसरीशी संबंध

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त योगेश सुभाषराव पाटील (रा.गणपती नगर, जळगाव मुळ रा.चाळीसगाव) याच्याविरुध्द सोमवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात तरुणीला मारहाण करुन घराबाहेर हाकलून लावणारी योगेशची पत्नी व वडील सुभाषराव पाटील यांच्याही विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी समाजकल्याण विभागातंर्गत चालविण्यात येणाºया एका संस्थेत कंत्राटी पध्दतीने नोकरी करीत आहेत.  कामानिमित्ताने योगेश पाटील याच्याशी तिचा संपर्क आला. त्यानंतर व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटींग तसेच घरी जेवणासाठी येणे-जाणे वाढले. दोघांमध्ये प्रेमप्रकरण बहरल्याने योगेश याने पीडित तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याच्या गणपती नगरात डिसेंबर २०१८ पासून सातत्याने बलात्कार केला. आजार निष्पन्न होताच नकारपीडित तरुणी आजारी राहत असल्याने १५ मे २०१९ रोजी नाशिक येथील एका दवाखान्यात तपासणी केली असता ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाल्याचे निदान झाले. या आजाराबाबत योगेश पाटील याला सांगितले असता आता तु माझ्या कामाची नाही असे सांगून संपर्क तोडला. त्याच्या घरी गेले असता त्याने घरातून हाकलून लावले.पत्नी व वडीलांनी दिले पैशाचे आमिषयोगेश पाटील याचे लग्न झालेले आहे. पत्नी असतानाही मी तुला नांदवेल, पत्नीची मी समजूत काढेल असे सांगितले होते,मात्र लग्नास नकार दिल्याने पीडिता त्याच्या घरी गेले असता पत्नी सीमा यांनी दोघांमधील संबंधाची माहिती घेतली. त्यांना मोबाईलमधील स्क्रीन शॉर्टचे पुरावे दाखविले असता हे प्रकरण बंद करण्यासाठी काय करावे लागेल. तुला पैसे देते पण हे प्रकरण बंद कर असे सांगितले. त्यानंतर त्याच्या वडीलांनीही शनिवारी मू.जे.महाविद्यालयाच्या परिसरात बोलावले व माझ्या मुलाला वाचव,हवे तेवढे पैसे घे म्हणून विनंती केली, मात्र मी लग्नावर ठाम असल्याने पीडितेने तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव