शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्तांविरुध्द खंडणीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 18:54 IST

वाळू व्यावसायिकाची तक्रार : दरमहा हप्तयाची मागणी

जळगाव : वाळू व्यवसायाविरुध्द आवाज न उठविण्यासाठी वाळू व्यावसायिकाकडून १ लाख ७० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (रा.शिवाजी नगर) यांच्याविरुध्द शहर पोलिसात शुक्रवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू व्यावसायिक विठ्ठल भागवत पाटील (३२,रा. ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार,विठ्ठल पाटील यांनी म्हटले आहे की, आपण वाळूचा व्यवसाय करीत असून त्यासाठी नियमानुसार शासकीय चलन भरतो. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात वाळू वाहतूकीचे सर्व व्यवसाय बंद आहेत. सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आपण शासनाची फी न भरता वाळू व्यवसाय करतात, त्यामुळे शासनाचे नुकसान होत आहे. तुमची व अधिकाऱ्यांची मी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो. माहिती अधिकारात तुमची माहिती काढतो. मला तुम्ही हप्ते द्या, नाही तर तुमच्याविरुध्द विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करेल तर अधिकाºयांविरुध्द तक्रारी करेल असे म्हणत धमकावले. दोन टप्प्यात घेतली खंडणीगुप्ता व अनिस पांडे यांनी २० एप्रिल २०२० रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बोलावून घेतले. गुप्ता म्हणाले की, मी तुला सांगितले होते की, तुझ्या व सोबत असलेल्या लोकांच्या व्यवसायाबाबत सांगितले होते, माझे काम केले नाही असे बोलून सागर पार्कजवळील पेट्रोल पंपाजवळ विठ्ठल पाटील आणि बाळू नामदेव चाटे असे गेले असता, गुप्ता यांनी शिवीगाळ व दादागीरी करून तुम्हाला जळगावात राहू देणार नाही, तुमच्या विरूध्द महितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवून खोटे गुन्हे दाखल करून तुला जेलमध्ये टाकेलह्ण असा दम दिला. त्यावेळी आपण बाळू चाटे यांच्यासमोर दिड लाख रुपये रोख दिले. त्यावर गुप्ता म्हणाले की, मला दर महिन्याला हप्ता तुम्ही लोकांनी द्यायचा आहे. पुन्हा मे महिन्यात मनपाजवळी खाऊ गल्ली येवून पुन्हा पैशांची मागणी केली त्यावेळी राहूल ठाकरे यांच्या समोर वीस हजार रुपये दिले. त्यानंतर १६ जून रोजी पुन्हा पैशांची मागणी केली. १९ जून रोजी गुप्ता यांचा सहकारी अनिस पांडे यांने सकाळी १० वाजता कोर्ट चौकात बोलावून गुप्ता व तुमचा वाद मिटवतो असे सांगितले. मात्र वाद मिटलाच नाही. शुक्रवारी सायंकाळी विठ्ठल पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अधिका-यांच्या सांगण्यावरुन ही खोटी तक्रार देण्यात आली आहे. चार जण जेव्हा मला भेटले, तेव्हा त्यातीलच एक जण आपण निष्पाप आहात असे म्हणतोय. त्याचे चित्रण सर्वत्र व्हायरल झाले. मी तक्रार दिल्यामुळेच त्यांनी ही तक्रार दिली आहे. खंडणी घेतल्याचे सिध्द करावे.-दीपक गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव