शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

रामदेव बाबाच भाजपा सरकारचे लाभार्थी - अशोक चव्हाण यांची जळगावात टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:10 PM

रावेर लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेऊ

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील प्रश्न कायमखडसे आपल्याही निरोपाची वाट बघताहेत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 25- भाजपा सरकार बँकाँगचा पूल भारतीय व्यक्तीसोबत दाखवून लाभार्थीची जाहिरात करीत आहे. प्रत्यक्षात शेतक-यांना कजर्माफी नाही, बोंडअळीचा लाभ नाही की आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसांना मदत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जळगाव येथे काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिकाच्या समारोप भाषणात केली.  भाजपा सरकारने रामदेव बाबांना 600 एकर जमीन मोफत दिली असून रामदेव बाबाच या सरकारचे लाभार्थी असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

जळगाव जिल्ह्यातील प्रश्न कायमएकीकडे रामदेव बाबांना जमीन दिली जाते, मात्र जळगाव जिल्ह्यातील प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने येथील प्रश्न कायम असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी पाडळसरे धरणाचे उदाहरण दिले. 

पदाधिका:यांनी मांडल्या व्यथाजळगाव जिल्ह्यातील परिस्थिती किचकट असून हे मी मान्य करतो, मात्र  भांडणे-तंटे बाजूला ठेवत काम केले तर आपल्याला यश मिळेल, असा सल्ला  अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकत्र्याना आढावा बैठकीत दिला. जिल्ह्यात ब:याच ठिकाणी गणित आखावे लागणार असून बदल करण्याविषयीदेखील ठरवावे लागेल, असेही संकेत त्यांनी दिले. दरम्यान, या वेळी बहुतांश ठिकाणच्या पदाधिका:यांनी जिल्हा पातळीसह पक्षाकडून त्या-त्या भागाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ग:हाणे मांडले. बुधवारी काँग्रेसचे शिबिर झाल्यानंतर संध्याकाळी जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. त्यात अशोक चव्हाण यांनी जिल्हातील स्थिती जाणून घेत वरील वक्तव्य केले. 

राष्ट्रवादीकडून पाय ओढले जातातजिल्ह्यात विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केली जाते व त्यात राष्ट्रवादीला 20 ते 25 वर्षापासून जागा सोडली जाते. मात्र त्यात त्यांना यश मिळत नाही व भाजपाला फायदा होतो. यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपण मदत करतो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काँग्रेसच्या उमेदवारांना मदत न करता पाय ओढण्याचेच काम केले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वतंत्र निवडणूक लढविण्याची मागणी पदाधिका:यांनी, कार्यकत्र्यानी केली. 

खडसे भाजपात कोठे आहे ?मुक्ताईनगर मतदारसंघातील पदाधिकारी माहिती देत असताना अशोक चव्हाण यांनी मध्येच त्यांना थांबवून ‘खडसे भाजपात कोठे आहे?’ असा सवाल केला. एकनाथराव खडसे यांना बोदवड तालुक्यातून मताधिक्य नसते, त्यामुळे ते या तालुक्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप बोदवड तालुक्यातील पदाधिका:यांनी केला. इतकेच नव्हे बोदवड सिंचन योजनेचे काम खडसे यांनी रोखल्याचामुद्दाउदयपाटीलयांनीमांडला.

खडसे आपल्याही निरोपाची वाट बघताहेतमुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात सतत राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडली जाते व उमेदवार पराभूत होतात, असे सांगितले जात असताना पुन्हा अशोक चव्हाण यांनी पदाधिका-यांना मध्येच थांबवत ‘खडेस सध्या काय करता’ ? असा प्रश्न विचारला. त्यावर पदाधिका:यांनी सांगितले की, खडसे सध्या आपल्याही निरोपाची ते वाट पाहत आहे.  पक्षात त्यांना घेण्याचा विचार करू नका, अन्यथा 20-25 वर्षाचे आमचे परिश्रम वाया जातील, असेही पदाधिका:यांनी नमूद केले.  

मनपा निवडणुकीमुळे जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघास वेळ द्यावा लागणारआढावा बैठकीत जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील आढावा घेतल्यानंतर जळगाव शहर व ग्रामीण मतदार संघाचा आढावा आज घेण्यात आला नाही. जळगाव मनपाची निवडणूक तोंडावर असल्याने त्यासाठी वेळ द्यावा लागणार असल्याने या दोन्ही मतदार संघाचा आढावा नंतर घेण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी बैठकीदरम्यान जाहीर केले. 

रावेर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सातत्याने पराभव होत असल्याने ही जागा काँग्रेसकडे घेण्याचा आग्रह पदाधिका:यांनी केल्यानंतर ही जागा काँग्रेसकडे घेऊ, असे अशोक चव्हाण यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाBaba Ramdevरामदेव बाबा