सर्व शक्ती सेनेतर्फे प्रा. संजय मोरेंना कोरोना योद्धा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:34 PM2021-10-10T17:34:32+5:302021-10-10T18:11:21+5:30

दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशनात पुरस्काराचे झाले वितरण

Pvt. Sanjay Morena Corona Warrior Award | सर्व शक्ती सेनेतर्फे प्रा. संजय मोरेंना कोरोना योद्धा पुरस्कार

सर्व शक्ती सेनेतर्फे प्रा. संजय मोरेंना कोरोना योद्धा पुरस्कार

Next

जळगाव : सर्व शक्ती सेना सामाजिक संघटनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आले. गांधी जयंतीला झालेल्या या अधिवेशनात जळगाव शहरातील प्रा. संजय मोरे व माया मोरे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यामध्ये गोर गरीब, होतकरू लोकांना वेळोवेळी जीवनावश्यक वस्तू, अन्न, धान्य, कपडे व आर्थिक मदत मोरे परिवाराने केली आहे. या कार्याची दखल घेत, सर्व शक्ती सेना सामाजिक संघटनेतर्फे प्रा. संजय मोरे, माया मोरे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाब येथील माजी केंद्रीय मंत्री पद्मश्री जितेंद्रसिंग शंटी उपस्थित होते. तसेच सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष नीरज सेठी, डॉ. सत्यनारायण जतिया, डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, दिलीप पांडे, जय सुमनाक्षर, वैभव आहुजा, राज विशिष्ठ, राजेंदर गुप्ता यांची उपस्थिती होती.

यांचा झाला सन्मान
विनायक महाजन, प्रवीण धुंदले, पत्रकार सागर दुबे, आशीष पाटील, पत्रकार संजय पाटील, संदीप गाढे, दीपक वानखेडे, दीपक चौधरी, राजेंद्र सपकाळे, कृष्णा सावळे, सुरेखा इंगळे, संगीता सोनवणे, सपना इंगळे.

Web Title: Pvt. Sanjay Morena Corona Warrior Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app