भुसावळ तालुक्यात हातभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:55 IST2018-10-28T00:54:15+5:302018-10-28T00:55:38+5:30

भुसावळ तालुक्यातील शिरपूर-कन्हाळा शिवारात गावठी दारू हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी २ हजार ८३४ लीटर दारू उद्ध्वस्त केली व एका आरोपीस अटक केली आहे,

Print in the Bhusaval taluka on the handbill | भुसावळ तालुक्यात हातभट्टीवर छापा

भुसावळ तालुक्यात हातभट्टीवर छापा

ठळक मुद्देदोन हजार आठशे लीटर दारू उद्ध्वस्तदोन लाख २२ हजाराचा माल हस्तगतडी.वाय.एस.पी. राठोड व पो.नि.कुंभार यांची संयुक्त कारवाई

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील शिरपूर-कन्हाळा शिवारात गावठी दारू हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी २ हजार ८३४ लीटर दारू उद्ध्वस्त केली व एका आरोपीस अटक केली आहे, तर एक बैलजोडी व बैलगाडीसह दोन लाख, २१ हजार ९०० रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई डी.वाय.एस.पी. गजानन राठोड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली तालुका व बाजारपेठ पोलिसांनी केली आहे.
शिवपूर-कन्हाळा शिवारात अवैध गावठी दारूभट्टीचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी सहा ते ६.३० वाजेच्या सुमारास डी.वाय.एस.पी. राठोड, पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सापळा रचून ही कारवाई केली. यात नवसागर मिश्रित दोन हजार ६०० लीटर कच्चे रसायन, जळत्या भट्टीवरील गरम २०० लीटर रसायन व ३४ लीटर तयार दारू तसेच एक बैलजोडी व बैलगाडी, गूळ, मोह, नवसागर मिश्रित १५ ड्रम कच्चे रसायन असा दोन लाख २१ हजार ९०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत सुभान सुपडू गवळी यास अटक करण्यात आली.
या पथकामध्ये तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुरेश वैद्य, प्रेमचंद सुरवाडे, गणेश सोनवणे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे फौजदार रवींद्र बिºहाडे, दीपक पाटील, गुलबक्षी तडवी, वाल्मीक सोनवणे, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण पो.कॉ. माळी आदी सहभागी होते.




 

Web Title: Print in the Bhusaval taluka on the handbill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.