भातखंडे बुद्रुक-गिरड रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:16 IST2021-09-13T04:16:07+5:302021-09-13T04:16:07+5:30
तळई उत्राण हनुमंतखेडे भातखंडे अंतुर्ली गिरड या गावातील लोकांची पाचोरा, भडगाव येथे जाण्यासाठी गर्दी असते. भातखंडे-गिरड रस्त्यावर ...

भातखंडे बुद्रुक-गिरड रस्त्याची दयनीय अवस्था
तळई उत्राण हनुमंतखेडे भातखंडे अंतुर्ली गिरड या गावातील लोकांची पाचोरा, भडगाव येथे जाण्यासाठी गर्दी असते. भातखंडे-गिरड रस्त्यावर दिवसभर मार्गावरील वाहनाची वर्दळ असते. नेहमी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना तर कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनात येत आहे.
थोड्या थोड्या अंतरावर खड्डे पडले तरी वाहनधारकांना साईडपट्ट्यांचासुध्दा वापर करता येत नाही. खड्ड्यांचे प्रमाण एवढे मोठे आहे की, खड्डे चुकविण्याच्या नादात जागोजागी लहान मोठे अपघात होत आहेत. संबंधित विभागाने खडी, डांबराऐवजी निदान पावसाळ्यापुरता मुरूम टाकून खड्डे बुजवावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
उत्राण-गिरड या रस्त्याचे तीनतेरा वाजले असून अवजड वाळू वाहतुकीमुळे छोटे मोठे वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती लवकर व्हावी, अशी अपेक्षा आहे.
-विनोद सुरेश पाटील, वाहनचालक, अंतुर्ली बुद्रुक
उत्राण-गिरड या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी चालवताना मोठी करसत करावी लागते. कंबरदुखीचा त्रास वाहनधारकांना होतो. लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा आहे.
-मयूर पाटील, भातखंडे बुद्रुक
120921\12jal_4_12092021_12.jpg
उत्राण-गिरड रस्त्याची दुरावस्था (छाया : संजय पाटील)