शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

‘गरीब रथ’मधून १२ लाख ८० हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 18:10 IST

गरीब रथ या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे साखर झोपेमध्ये असताना १२ लाख ८०हजाराचे सोन्याचे दागिने असलेली हॅन्डबॅग चोरट्यांनी लांबविली

ठळक मुद्देगरीब रथ एक्सप्रेसमधील हरदा भुसावळ दरम्यानची घटनामध्य प्रदेशच्या प्रवाशाची चोरट्यांनी पळविली हॅण्डबॅग

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : गरीब रथ या गाडीने प्रवास करणाऱ्या मध्य प्रदेशच्या प्रवाशाचे हरदा ते भुसावळ दरम्यान साखर झोपेमध्ये असताना १२ लाख ८०हजाराचे सोन्याचे दागिने असलेली हॅन्डबॅग चोरट्यांनी लांबविली ही घटना ३ रोजी रात्री साडेबारा ते पहाटे चारच्या दरम्यान घडली.आशिष सोनी रा.गाडरवारा, जि.नरसिंगपूर, मध्य प्रदेश हे त्यांच्या पत्नीसह गाडी क्रमांक १२१८७ अप गरीब रथ गाडीच्या जी/४ कोचमध्ये सीट क्रमांक ४०-४१ वर प्रवास करीत होते. ते साखर झोपेत असताना ३ रोजी रात्री साडेबारा ते चारच्या सुमारास चोरट्याने त्यांची हॅण्डबॅग घेऊन पलायन केले. बॅगमध्ये सोन्याचे नेकलेस, अंगठी, बिंदी, चैन, बांगड्या, घड्याळ, मोबाइल, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड असा एकूण १२ लाख ८० हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. परंतु ही घटना भुसावळ विभागातील असल्यामुळे ही भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. याप्रकरणी लोहमार्गाचे पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव हे तपास करीत आहे.दरम्यान, नुकतेच १५-२० दिवसांपूर्वी मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे अधिकारी विवेककुमार गुप्ता हे सपत्नीक प्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांची ही बॅग लांबवली होती.रेल्वेच्या प्रवासात सुरक्षेविषयी प्रश्नचिन्हआरामदायी, सुरक्षित, स्वस्त प्रवास म्हणून रेल्वे प्रवासाकडे जनसामान्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. परंतु प्रवास करत असताना मोबाइल, सामान, मौल्यवान वस्तू चोरीस जाणे हे नित्याच्या घटना झाल्या आहेत.डीआरएमसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या सामानाची रेल्वे प्रवासादरम्यान चोरी होते तर सर्वसामान्यांच्या प्रवासावर सुरक्षित प्रवास करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सुरक्षेविषयी मोठ्या गप्पा, कृती मात्र शून्यसणासुदीचे दिवस सुरू आहेत. रेल्वे प्रवास करत असताना नियोजित ठिकाणी सोबत असलेला सामान सुरक्षितरित्या पोहोचेल याची हमीच दिसून येत नाही. रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेविषयी मोठमोठ्या गप्पा करतात. मात्र दररोज चोरीच्या घटनांमुळे कृती शून्य दिसून येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ