जळगाव महापालिका निवडणूक : मेहरुण भागात संथगतीने मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:05 IST2018-08-01T14:02:09+5:302018-08-01T14:05:45+5:30
मेहरुण परिसरातील मतदान केंद्रांतवर सकाळी ११ वाजेपर्यंत संथगतीने मतदान सुरु होते. सकाळच्या वेळी नोकरीला जाणाऱ्या मतदारांनी आपला हक्क बजावला.

जळगाव महापालिका निवडणूक : मेहरुण भागात संथगतीने मतदान
जळगाव : मेहरुण परिसरातील मतदान केंद्रांतवर सकाळी ११ वाजेपर्यंत संथगतीने मतदान सुरु होते. सकाळच्या वेळी नोकरीला जाणाऱ्या मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी ११ वाजेनंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली.
नेहरू नगर भागातील सेंट टेरेसा स्कूलमध्ये सकाळी वर्दळ कमी होती. खाजगी कंपनीतील नोकरदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. विद्या इंग्लिश स्कूल व मनपा शाळा क्रमांक १९ मध्ये अधून-मधून मतदारांची वर्दळ सुरु होती. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तांबापुरा व मेहरुण या मिश्र वस्तीमध्ये मतदारांना केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी रिक्षा व वाहनांचा वापर करण्यात येत होता. या.दे.पाटील विद्यालय, राज माध्यमिक विद्यालयात सकाळी १० वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढली. सिंधी कॉलनीतील मतदान केंद्रात सकाळी ११ वाजेनंतर मतदारांची गर्दी वाढली.