भुसावळात कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:16 IST2018-10-01T16:08:59+5:302018-10-01T16:16:19+5:30

जामनेर रस्त्यावरील कुंटणखान्यावर रविवारी बाजारपेठ पालिसांनी छापा टाकून ११ महिला तर ६ पुरुषांना कारवाईसाठी ताब्यात घेतले.

Police raid on Bhusaval | भुसावळात कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा

भुसावळात कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा

ठळक मुद्देजामनेर रस्त्यावरील कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई११ महिला व ६ पुरुषांना घेतले ताब्यातवाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई

भुसावळ : येथील जामनेर रस्त्यावरील कुंटणखान्यावर रविवारी बाजारपेठ पालिसांनी छापा टाकून ११ महिला तर ६ पुरुषांना कारवाईसाठी ताब्यात घेतले.
दिवसेंदिवस शहरात गुन्ह्याचे प्रमाण वाढत असूण, त्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांना पकडण्यास यश आले आहे.
अशा या वाढत्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाने कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यात देहविक्री करणाऱ्या ११ महिला तसेच शक्ती रणवीर तूळनायक, वाल्मीक शिवराम कोळी (भोईवाडा), रणजीत दिलीपसिंह ठाकूर (परभणी ), रवींद्र हुकुमचंद राठोड (महादेव माळ), आदिनाथ धनसिंग तनोजे (खरगोन), दिनेश नरसिंग तनोजे (खरगोन) या सहा पुरुषांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील मोबाइल व पैसे जमा केले आहे.

Web Title: Police raid on Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.