शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 11:55 IST

गुन्हा दाखल : तीन महिन्याची गर्भवती राहिली तरुणी, लग्नानंतर प्रकार उघड

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शेतात कापूस वेचण्याच्या कामाला येत असलेल्या तरुणीवर शेत मालक व जिल्हा पोलीस दलातील हवालदार कैलास तुकाराम धाडी (रा.लोणवाडी, ता.जळगाव) याने अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी तीन महिन्याची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पीडितेच्या फिर्यादीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास धाडी हा लोणवाडी येथील रहिवाशी आहे. आॅक्टोबर २०१९ मध्ये गावातील १९ वर्षीय तरुणी त्याच्या शेतात कापूस वेचण्याच्या कामासाठी आलेली असताना विहिरीवर पाणी घेण्यासाठी जात होती. त्या वेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये कैलास याने पीडितेवर जबरदस्ती अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तिला दिली.त्यामुळे पीडितेने या प्रकाराची वाच्यता केली नाही. मध्यंतरीच्या काळातही कैलास याने सतत त्याच पत्र्याच्या खोलीत वारंवार अत्याचार केला.विवाहानंतर फुटले बिंगया घटनेनंतर २४ मे २०२० रोजी पीडित तरुणीचे लग्न झाले. २८ मे रोजी त्रास होत असल्याने पती व सासरच्यांनी तिला चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात नेले असता पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. तेव्हा पीडितेने झाल्या प्रकाराची पती व सासरच्यांना माहिती दिली. रविवारी पीडिता माहेरी आली असता कुटुंबाला घेऊन तिने रात्री एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. झाल्याप्रकाराची माहिती कथन केल्यानंतर मानव संसाधन विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक सुनंदा पाटील यांनी पीडितेची फिर्याद घेतली. तेव्हा मध्यरात्री कैलास तुकाराम धाडी याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व कॉन्स्टेबल रतिलाल पवार करीत आहेत. दरम्यान, कैलास याच्या शोधार्थ पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.धाडीची कारकिर्द वादग्रस्तकैलास धाडी हा जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. २०१८ मध्ये त्याची एमआयडीसी पोलीस ठाण्यातून पहूरला बदली झाली होती. मात्र तो पहूर येथे हजरच झाला नाही. त्यामुळे त्याची मुळ नेमणूक कुठे आहे, हेच स्पष्ट होत नाही. असे असताना त्याचे वेतन व इतर भत्ते मात्र नियमित निघत आहेत. मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांचीही भूमिका यात संशयास्पद आहे. धाडी याच्याविरुध्द याआधी देखील गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव